0


BY - युवा महाराष्ट्र लाईव - चंद्रपूर 

ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विष घेत आत्महत्या केली आहे. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे

शीतल आमटे या संपूर्ण आनंदवनची जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला.

मध्यंतरी शीतल यांनी या वादाबाबत एक फेसबुक लाईव्ह केलं होतं,नंतर त्यांना तो व्हिडिओ डिलिट करावा लागला होता .आनंदवन मधील वादावरून गेल्या काही दिवसापासून शीतल या चर्चेत आल्या होत्या .त्यांनी अचानक आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे

Post a Comment

 
Top