मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी गाले बनले अवैध धंदयाचे गोदाम सरकारच्या जागा भुखंड हाडप संचालकांनी गाले वाटून घेतले कारवाईची मांगणी
BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे
स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करून पुढार्यांनी लोकप्रतिनिधीनी शासनाचे मिळवलेले भुखंड जागा गिळगुत करून त्यावर शेतकर्यांसाठी उभारलेल्या व्यापारी गाल्यांची 6 ते 7 लाखाना विक्री केल्याचा प्रकार मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये घडला आहे.काँगे्रस राष्ट्रवादीच्या कालावधी सत्तेत आमदार गोटीरामभाऊ पवार यांनी शेतकर्यांसाठी निर्माण केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने मुरबाड शहरात महसुल खात्याची 2 एकर 27 गुंन्ठे जागा प्रथम घेवुन कार्यालय भातखरेदी गोडावुन उभी केली.त्यानंतर 2 एकर जागा पुन्हा प्रॉपट्री कार्डवर बेकायदेशीर मिळवुन सदर जागेवर वॉलकंपाऊंड बांधणे रस्ते शौचालय इमरत यासाठी कोटी रूपये शासनाचा निधी मिळवला...
परंन्तु तालुक्यातील शेतकर्याना त्याचा काडीचाही फायदा झाला नाही.जेवनावळी पाटर्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवडा बाजार निधी जमाकरून उपयोग केला.तसेच रेशनिंग दुकाने भाडयाने दिलेल्या गोडावुन इमारती याचा भाडा याची उधळपट्टी केली.
वाढते राजकारण पहाता गोटीरामभाऊ पवार यांनी तात्कालीन चेअरमन लक्ष्मण घुडे यांच्या कालावधीत महसुल कडुन मिळवलेल्या जागेत शेतकर्यासाठी शेतीपुरक धंदयासाठी दोन व्यापारी संकुल इमारती उभ्या करण्यासाठी पणन मंडळाकडे टप्पा क्र.1 व टप्पा क्र.2 मधील 120 तसेच 80 अशा 200 व्यापारी गाल्याना परवानगी मिळवुन शासनाकडून निधी मिळवुन आमदार गोटीरामभाऊ पवार याचे पुत्र सुभाषदादा पवार त्यांची सुन मुले यांच्या नावे खरेदी केली.प्रत्येक्षात सदरचे गाले 2 लाख ते 4 लाखापर्यंत विक्री करून त्यांना शुलक भाडेपावती 500 ते 700 रूपये लावुन कोटी रूपायाचा गैरव्यवहार केला…
एवढयामोठया इमारती घोटाळयाकडे कोणी पहात नाही काँगे्रस राष्ट्रवादीची सत्ता असताना तात्काळीन चेअरमन लक्ष्मण घुडे यांच्या नियंत्रणाखाली खोटे ठराव घेवुन पणन महामंडाची तसेच तात्कालीन ग्रामपंचायतीची कोणत्याही प्रकारे परवानगी नसताना 72 गाल्यांची व्यापारी इमरत उभी केली.त्याची ठेकेदारी सुध्दा माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र सुभाष पवार यांनी केली.सदर इमारतीचे बांधकाम महासुल विभागाच्या कर्मचारी वसाहत साठी राखीव असल्याचे समजताच नागरिकांनी तक्रारी केल्या त्याची चौकशी तात्कालीन तहसिलदारानी करून सदर इमरत शर्तभंग करून शासन जमा करण्याचा प्रस्ताव्ए उपविभागीय अधिकारी कल्याण यांना पाठवला आणि 19 लाख रूपये रॉयल्ट्री दंड सुभाष पवार यांच्या कंन्ट्रक्शनला करण्यात आला.सदरची केस सुरू असताना सत्तेचा उपोयोग करून माजी आमदार गोटीराम पवार तात्कालीन चेअरमन संचालकानी तसेच ठेकेदार सुभाष पवार यांनी आपील करून प्रकरण दडपले आणि महसुलखात्याची रॉयल्ट्री भरली नाही..
72 व्यापारी गाल्याची विक्री 5 लाख 6 लाख 7 लाख अशी करून कागदोपत्री 100 रूपय स्टॅम्पपेपरवर भाडेकरार केला यातुन त्यांनी कोटी रूपये कमविले.संचालकाना मोफत गाले देण्यात आले येथील सर्वच गाल्यांमध्ये अवैध दुकाने थाटण्यात आली असुन गुटखा नवसागर गोदामे आहेत.शेतीपुरक दुकाने नसुन शेतकरी व्यक्तीरिक्त गाले विक्री झाली आहे.या भ्रष्टाचारात सहाय्यक निबंधक जिल्हानिबंधक पणन महामंडळ सर्व संचालक ठेकेदार चेअरमन प्रभारी सचिव क्लार्क सहभागी असल्याचे चौकशी अतिंम समोर येणार असुन सदरचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी आपली ठेकेदारी अखंड ठेवण्यासाठी सुभाष पवार यांनी शिवसेनेत प्रवेश करून जिल्हापरिषद उपाध्यक्षपद मिळवले आहे.मात्र मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती कोणत्या पक्षाची आहे हे तळयात गळयात असुन राज्याचे पारदर्शक मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन संचालक सचिव ठेकेदाराना पाठिशी न घालता पक्षहित न पहाता कारवाई करावी अशी मांगणी ज्येष्ट पत्रकार तथा शेतकरी नामदेव शेलार यांनी केली आहे.मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाचे ही संचालक असुन विरोधीपक्ष म्हणुन हया घोटाळयाकडे भाजपा का दुर्लक्ष करते हे गुलदस्त्यात असुन याच इमारती मधील गाले विक्रीत भ्रष्टाचार करणार्यानी विज पाणी शौचालय कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत.एका महिला पत्रकाराचा कार्यालय सामदाम दंड भेदाने सामन फेकून देवुन खाली केला आहे.त्यासाठी भाजपा रस्त्यावर येर्इल का?जशी अर्नब गोस्वामीसाठी आली जशी शिवसेनेच्या मुख्यमंञ्यानी पारदर्शकता दाखवली तशी दाखवणार काय?आमदार अधिवेशनात प्रश्न मांडतील काय? असे विविध प्रश्न चर्चेत जात असुन इमरत शासना जमा तात्काळ करावी अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
No comments