BY - युवा महाराष्ट्र लाइव – चंदिगड
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. अमित शाह यांचं हे आवाहन स्वीकारण्याचं आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलं आहे. अमित शाह यांनी सांगितल्याप्रमाणे एका ठराविक स्थानी जाण्यात यावं, जेणेकरुन आपल्या समस्या आणि मागण्याबाबत चर्चा करण्याचा मार्ग प्रशस्त होईल, असं आवाहन अमरिंदर सिंग शेतकऱ्यांना केलंय. “पंजाब सीमेपासून दिल्ली-हरियाणा सीमेवर विविध शेतकरी संघटनेच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आंदोलक शेतकऱ्यांना 3 डिसेंबरला चर्चेसाठी बोलावलं आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सर्व समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तयार आहे”, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे.
Post a comment