web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबई महानगर क्षेत्राला वीजेबाबत आत्मनिर्भर करण्याचा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा संकल्प

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

मुंबई महानगर आणि लगतचा परिसर अर्थात एमएमआर हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असून हे इंजिन पूर्ण क्षमतेने कार्यरत राहण्यासाठी वीजेची गरज आहे. मुंबईसह एमएमआरला विजेबाबत आत्मनिर्भर करण्यासाठी ऊर्जा विभाग वेगाने कामाला लागला असून त्यामध्ये यश आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.डॉ. राऊत यांनी मंगळवारी गोरेगाव येथील अदानी इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले की, अदानी समुहाने त्यांची आयलँडिंग यंत्रणा, स्काडा यंत्रणा याविषयक सादरीकरण केले. त्यांची यंत्रणा प्रगत आणि अद्ययावत असल्याचे जाणवले. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राची (एमएमआर) विजेची गरज भागविण्यासाठी अदानी समुहाचे अतिरिक्त वीज निर्मितीविषयक काय नियोजन आहे, याची माहिती घेतली आणि याविषयी त्यांची योजना सादर करण्याचे निर्देशही दिले. तसेच विक्रोळी येथील 440 केव्ही वीज पारेषण उपकेंद्र उभारणीचे कामही अदानी समूहाला मिळाले असून हे काम त्यांना २०२२ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. हे उपकेंद्र उभारणीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखला आहे का याचा तपशील जाणून घेतला. याशिवाय अदानी समूह मुंबई परिसरात एच व्ही डी सी केंद्र उभारत असून त्यामुळे मुंबईला अतिरिक्त १ हजार मेगावॅट (MW) वीज उपलब्ध होणार असल्याचे यावेळेस मला सांगण्यात आले.

No comments