web-ads-yml-728x90

Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यास परवानगी

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव – सोलापूर |

कोरोनाच्या वाढत्या प्रादर्भावामुळे यंदा शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, मात्र आता 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून शहरातील शाळा सुरू केल्या जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे.कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा 23 नोव्हेंबरपासून उघडण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये एक दिवसाआड अध्यापन सुरू राहणार असून, त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात सध्या 3 हजार 261 शिक्षक कार्यरत असून, सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे, त्यातील 30 शिक्षक कोरोनाबाधित निघाले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे, शाळा दोन शिफ्टमध्ये सुरू होतील, शिफ्ट निवडण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना असेल, एका वर्गात 20 विद्यार्थी असतील, शाळा सकाळी 7.30 ते 11.30 व दुपारी 1.30 ते 5.30 या वेळेत भरणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.

No comments