web-ads-yml-728x90

Breaking News

स्वातंञ्याची 75 वी साजरी करू देणार नाही - बाळाराम भोईर

 

BY - गौरव शेलार , युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

स्वातंञ्याला सन 2022 मध्ये 75 वर्षे पुर्ण होत असताना आजही गोरगरीब वंचिताना अन्न वस्त्र निवारा रोजगाराचं साधन मिळाले नाही.प्रशासन लोकप्रतिनिधी मालक म्हणुन वावरतात हे आपले नोकर आहेत.सार्वसामान्य जनता खरी मालक आहे.याचं स्वातंञ्य मिळालेल्या 26 नोव्हेंबर संविधान म्हणुन साजरा करतो मात्र येत्या 2022 पर्यंत गोरगरीब वंचिताना त्यांचा न्याय हक्क अधिकार मिळाला नाही तर आम्ही राज्यकर्ते मंत्री प्रशासनाला 75 वी भारतीय स्वातंञ्य दिनाची जयंती साजरी करू देणार नाही असा इशारा श्रमजिवी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी मुरबाड येथे दिला.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी 26 नोव्हेंबरला घटना सुर्पूत केली म्हणुन संविधान दिन साजरा होत आहे.परंन्तु घटनेच्या कलम 21 मध्ये तमाम जनता मालक आहे.प्रशासकीय अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी लोकसेवक आहेत त्यांनी सामान्यावर दबावशाही करू नये त्यांच्या बुध्दीमत्तेत बद्दल व्हावा याची आठवण म्हणुन प्रत्येक शासकीय कार्यालयात संविधान कलम 21 तसेच संविधान प्रस्तावता लावण्यात आली.

मुरबाड तहसिलदार कार्यालयात तहसिलदार अमोल कदम,श्रमजिवीचे कार्यकर्ते तथा ज्येष्ट पत्रकार नामदेव शेलार,श्रमजिवीचे जिल्हा युवक कातकरी घटक अध्यक्ष पंकज वाघ,तालुका अध्यक्ष वसंत मुकणे यांच्या हस्ते संविधान फोटो लावण्यात आला तसेच 

 

पंचायत समिती मध्ये ज्येष्ट पत्रकार तथा श्रमजिवी कार्यकर्ते नामदेव शेलार यांच्या हस्ते संविधान प्रत लावण्यात आली.वनविभागाच्या कार्यालयात श्रमजिवीचे जिल्हा युवक संघटक पदाधिकारी सचिव तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते संविधान फोटो लावण्यात आले.मुरबाड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस बाळारामभाऊ भोईर,पो.निरिक्षक सोनोने, पो.उपनिरिक्षक चौधरी,ज्येष्ट पत्रकार तथा श्रमजिवी कार्यकर्ते नामदेव शेलार,ठाणे जिल्हा कातकरी घटक अध्यक्ष पंकज वाघ,महेश वाघ,तालुका अध्यक्ष वसंत मुकणे यांच्या हस्ते संविधान प्रस्तावाना लावण्यात आली.श्रमजिवी संघटनेने ठाणे रायगड पालघर नाशिक या चार जिल्हयात संविधान दिन साजरा करण्यात येत आहे.याच दिवसापासुन गोरगरीब अनुसुचित जाती जमाती वंचिताना मुलभुत गरजा 2022 पर्यंत पुर्णता मिळवुन देण्यासाठी अभियान राबवला जाल.आदिवासानी तहसिलदार पंचायत समिती पोलिस ठाणे ग्रामपंचायत पत्येक कार्यालयात आपल्या न्याय हक्कासाठी लढा दयावा तुमच्या पाठीशी खंबीरपणे श्रमजिवी संघटना उभी आहे कोणाच्याही दबावदहशत वादाला घाबरू नका.संविधानात दिलेला अधिकार मिळेपर्यंत आम्ही 2022 पर्यंत लढुन न्याय हक्क प्राप्त करून स्वातंञ्याची 75 वी साजरी करू असा अशावाद बाळारामभाऊ भोईर यांनी व्यक्त केला.यावेळी शहीद जवानाना तसेच 26 11 हल्यात हुतात्मे पत्कारलेले स्व.करकरे कामटे साळसकर ओंबळे आणि त्यांच्या सहकारी शहीदाना श्रध्दांजली आर्पण केली.आमच्या कार्यकर्त्याला बुट पाहिलेत का? अशी भाषा वापरणारे मुरबाडच्या पोलिस अधिकार्‍यांचे बुट पहाण्यास आम्ही आलो आहोत मात्र तोच अधिकारी पळुन गेला मात्र त्यांनी आमच्या कार्यकर्त्याची माफी मागे पर्यंत आंदोलन सुरू ठेवु पुन्हा अशी भाषा अधिकारी कर्मचार्‍यानी वापरल्यास आम्ही सहन करणार नाही.जेलभरो आंदोलन करू असा इशारा देत आपला संताप व्यक्त केला त्यावर डीवायएसपी बसवराज शिवपुजे यांनी सदर बाब चुकीची असुन त्यांना माफी मागण्यास सांगु असे सांगुन पुढील आंदोलनाची दिशा शांत केली.खावरी कर्ज जातीचे दाखले राहात्या घराच्या घरपट्टया रेशनिंग कार्ड अशा विविध समस्या सोडवण्यासाठी श्रमजिवी संघटनेचे अभियान आजपासुन सुरू झाला आहे.कार्यकर्त्यांनी आडल्या नडल्याची कामे मार्गी लावुन दयावी.शासनाकडे न्याय हक्कासाठी जेलभरो करू न्याय मिळाला नाही 

 


 

तर स्वातंञ्याची 75 वी साजरी करू देणार नाही असा इशाराच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बाळारामभाऊ भोईर यांनी दिली.यावेळी श्रमजिवी संघटनेचे प्रभारी सचिव महेश वाघ ठाणे जिल्हा कातकरी घटक युवक अध्यक्ष पंकज वाघ श्रमजिवीचे कार्यकर्ते तथा ज्येष्ट पत्रकार नामदेव शेलार सेल्क्युलरचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष रविंंद्र चंदने यांचीही भाषणे झाली यावेळी भिवंडी तालुका युवक अध्यक्ष मुरबाड तालुका युवक घटक प्रमूख नितीन भला युवक घटक प्रमुख दिलीप शिद अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पुढील सहामहिण्यात बारवी धरण ग्रस्त काळुशाहीधरण ग्रस्त यांना न्याय मिळवुन देण्यासाठी श्रमजिवी संघटना पुढे येणार असुन मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती अनाधिकृत व्यापारी गाले भ्रष्टाचार व मुरबाड नगरपंचायत अनाधिकृत दुमजली व्यापारी गाले यावर कठोर कारवासाठी भुमिका बजावणार असल्याची माहिती पत्रकाराना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बाळारामभाऊ भोईर यांनी दिली.मुरबाड शहरातील लिज समस्या ठेकेदारी गैरव्यवहार आदिवासी कृषी अन्य योजनाचा लाभ बेरोजगारी रेशनिंग आरोग्य अनाधिकृत बांधकामे सरळगांव येथील शेतकर्‍यांच्या सातबारावर एमआयडीसीचे लावलेले शिक्के पर्यावरण अभयारण्य अशा विविध विषयांवर लक्ष घातले जाणार असुन ज्येष्ट पत्रकार नामदेव शेलार यांनी याकडे संघटनेच्या नेत्याचे लक्ष वेधले आहे.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनीही यासर्व समस्यावर चर्चा अंतिम आंदोलने उपोषण निर्णय घेवु असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

No comments