BY - कुणाल शेलार, युवा महाराष्ट्र
लाइव – मुरबाड |
मुरबाड तालुक्यात गर्भवती
महिला किंवा अन्य महिलांना होनार्या आजाराविषयी निदानासाठी महिला डॉक्टर नसल्याची
खंत कालपर्यंत सर्वत्र मुरबाडमध्ये वाटत होती.गर्भवती महिलांसाठी स्त्री रोग तज्ञ महिला
डॉक्टर कार्यरत नव्हती,महिलांच्या बाबतीत महिलांच्या उपचारासाठी महिला डॉक्टराची अवश्यक्यता
आहे अशी ओरड असताना महिलांच्या या ओरडेची हाक अखेर ग्रामीण भागातील त्या महिला डॉक्टरांनी
एैकली आणि केवळ महिलांच्या सेवेसाठी त्यांचे आधार म्हणून मुरबाड शहरात 24 तास तत्पर
म्हणून " माहेर हॉस्पिटल " उभे राहिले.अनेक महिलांचे गंभीर प्रश्न असतात
अशा वेळी कधी कधी त्या गंभीर प्रश्नाला पुरूष डॉक्टरांकडे मांडत नाहीत म्हणून कल्याण,ठाणे
शहरातील ठिकाणी उपचारासाठी व डिलीव्हरीसाठी जातात.मुरबाड शहरातून इतर शहरात प्रवास
करावा लागत असल्याने मुरबाड शहरातच " माहेर हॉस्पिटल " निर्माण करण्यात आले.या
" माहेर हॉस्पिटल " मध्ये गरिबातील गरिब महिला आज आपले प्रश्न स्त्री रोग
तज्ञ महिला डॉक्टरांसमोर मांडून त्या प्रश्नावर निराकरण करित आहे.गोरगरिबांची सावली
म्हणून " माहेर हॉस्पिटल " चे धडाडी पाऊल आज मुरबाड तालुक्यातील महिलांचा
आधारच बनली आहे.घरातील आर्इ,वडीेल,भाऊ,बहिणींचे जसे माहेरी आल्यावर प्रेम मिळते तसेच
प्रेम आणि आपुलकी मिळत राहो या दृष्टिकोनातून " माहेर हॉस्पिटल " हे नाव
देण्यात आले आहे.
या " माहेर हॉस्पिटल "चे स्त्री
रोग तज्ञ महिला डॉ.स्नेहल वाकचौरे,डॉ.कमलतार्इ चौधरी व त्यांचे सर्व महिला डॉक्टर,स्टाफ
ग्रामीण भागातील महिलांच्या सेवेसाठी तत्पर असताना दिसत आहे.उंचशिखर गाठतांनाही विश्वासाची
चार चाकी असावी लागते तसेच महिलांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी महिला डॉक्टृाचीच गरज
असते.अनेक खाजगी रूग्णालयात लुटमारी होते हे आपण जाणतो परंतू " माहेर हॉस्पिटल
" मध्ये महिलांची काळजी घेतली जाते त्यामुळेच या " माहेर हॉस्पिटल
" मध्ये महिलावर्ग उपचार तथा डिलीव्हरी साठी येत असल्याने आपण अंदाज लावू शकतो
की खरंच नावाला नव्हे तर कर्माला ही " माहेर " हेच नाव शोभून दिसते.
" माहेर हॉस्पिटल " मध्ये महिलांच्या सेवेसाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या
आहेत.मुरबाडची महिला ही मुरबाडमध्येच उपचार घेऊन बरी व्हायला हवी अशी मनोधारणा
" माहेर हॉस्पिटल " ची आहे.आणि त्यामुळेच " माहेर हॉस्पिटल " यांस
" माहेर " घर म्हणून ओळख दिली गेली आहे.
दिलेले वचन मोडता येते मोडतात परंतू विश्द्याास
संपादन करण्यासाठी एक कार्यच महत्वाचे ठरते आणि आज " माहेर हॉस्पिटल " च्या
कार्यामुळेच " माहेर हॉस्पिटल " वर शेकडो महिलांचा विश्वास बसला आहे.कमी
परंतू अत्यंत मोलाचे सहकार्य स्त्री रोग तज्ञांचे मार्गदर्शन महिला वर्गाला मिळत आहे.
" माहेर हॉस्पिटल " दिवस रात्र महिलांच्या सेवेशी धावले आहे.त्यामुळे ग्रामीण
भागातील महिलांचे " माहेर " हे हॉस्पिटल आधार बनले आहे.स्त्री रोग तज्ञ महिला
डॉ.स्नेहल वाकचौरे,डॉ.कमलतार्इ चौधरी या दोन महिला डॉक्टरांनी मुरबाडमध्ये महिलांसाठी
" माहेर हॉस्पिटल " चालू केले त्यामुळे त्यांचे सर्वत्र महिलावर्गांकडून
आभार व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post a comment