web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबई नाशिक एक्सप्रेसवे कंपनीच्या कर्मचारी मदतीनेJCB लावून अनलिगल कट बंद करण्याची मोहीम सुरू

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - शहापूर

मुंबई आग्रा  महामार्ग क्र 03वर महामार्ग  पोलीस केंद्र शहापूर हद्दीत कसारा चिंतामन वाडी कसारा ते  सोनाळे फाटा भिवंडी  71कि.मी. यादरम्यान अनलीगल कट /ऑनोथ्राईस कट अनेक   रस्ता दुभाजकावर पडलेले होते. त्यामुळे महामार्गावर अपघात जास्त प्रमाणात होत होते. अपघात कमी करण्यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या  रस्ता सुरक्षा अभियान संबंधित कार्यक्रम आयोजित केला होता ठिक ठिकाणी चौकसभा  कार्यक्रम  महामार्ग पोलिस यांनी घेतली. जाहिरात, पत्रके वाटप केली गांधीगिरी पद्धतीने फुल वाटून वहाने चालक मालकांना  माहिती दिली आहे परंतु अपघात म्हणावे त्या प्लॅनप्रमाणे कमी झाले नाहीत. म्हणून कसुरदार वहान चालकास ई चलन मशीन व्दारे केसेस  करण्यात येते आहे. पण महामार्गावर आजुबाजुला असणारे रहिवासी, हाॅटेल मालक, पेट्रोल पंप चालक,व इतर उद्योजक यांनी सदरचा कट ओपण केले होते त्या मधून लहान मोठी वहाने व प्रवाशी अचानक येतात. समोरचे  येणारे वहान  वेगामुळे अपघात घडत होते आणि इतर वहानाना अडथळा निर्माण होतो. ट्राफीक होत होते ट्राफीक मध्ये अत्यावश्यक सेवा वहाने, VIP कॅनव्हाय वहाने, सार्वजनिक वहाने अडकून पडत होती. नासिक ते मुंबई असा प्रवासास वेळ सुध्दा जास्त लागत आहे म्हणून आज महामार्ग पोलिस केंद्र शहापुर येथील अधिकारी आणि कर्मचारी व MNEL मदतीने मुंबई नाशिक एक्सप्रेसवे कंपनीच्या कर्मचारी मदतीनेJCB लावून अनलिगल कट बंद करण्याची मोहीम सुरू केली  व महामार्ग पोलीस केंद्र शहापुर यांचे अधिकारी अंमलदार प्रत्यक्ष उभे राहून सदर कट बंद करण्यात आलेले आहेत यापुढेही कोणी कट  तयार केले तर ते बंद करण्यात येतील नोटीस बोर्ड ठिकाणी लावण्यात येत आहेत त्याप्रमाणे संबंधितांना नोटीस सुद्धा बजावण्यात आलेले आहे त्यामुळे अपघातात कमी होण्याचे प्रमाण कमी होईल हा महामार्ग पोलिसांचा प्रयत्न चालू आहे

 

No comments