0

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे |

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील शेतकर्‍यांना शेतमाल कुठेही आपल्या मर्जीनुसार विक्री करता यावे यासाठी संसदेत कृषी विधेयक मंजुर करण्यात आले.शेतकरी अर्थिक दुष्या सक्षम होर्इल परंन्तु विरोधीपक्ष शेतकर्‍यांची दिशाभुल करून राजकारण करत असल्याची माहिती भिवंडीचे खासदार कपील पाटील (kapil patil) यांनी मुरबाड येथे पत्रकार परिषदेत दिली.

केंन्द्रीय कृषी विधेयकाची माहिती शेतकर्‍यापर्यंत पोहचवण्यासाठी मिडीयाने सहकार्य करावे अशी विनंती करून विरोधीपक्षाना आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अस्तीत्व कमी होर्इल अशी भिती वाटते असे सांगितले.


शेतकर्‍याना मालसाठवणुक आणि विक्रीसाठी कुठे जागा उपल्बध करून देणार कृषी उत्पन्न बाजार समित्याना शेतकरी माल विक्री व्यवसाय करिता जागा शासकीय भुखंड दिले आहेत.त्या सरकार परत घेणार काय ? असा प्रश्‍न आमच्या कडुन विचारला असता सदर जमिनी शासनजमा करणे ही राज्यसरकारची जबाबदारी आहे.केंन्द्र सरकार प्रत्येक रेल्वे स्टेशन लगत माल विक्री साठवणुकसाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे उत्तर खा.कपील पाटील यांनी दिले.

शेतकर्‍यांना आता दलाली आडारी दयावी लागणार नाही.ऑनलार्इन व्यवसाय करता येर्इल परदेशी गुंतवणुक शेतकर्‍यांना कायदेशीर ठरेल मात्र कॉगे्रस शेतकर्‍यांची दिशाभुल करून कृषी विधेयकाला विरोध करतात असे सांगितले.हाथरस प्रकरणी काँगे्रस राजकारण करत आहे.उत्तरप्रदेशात केलेले आंदोलन भेटीगाठी राजस्थानात का करत नाहीत तेथेही महिलावर अत्याचार होतात असेही खा.कपील पाटील यांनी बोलताना सांगितले.

आमदार किसनराव कथोरे(kisan kathore) यांनी मुरबाडचा विकास आराखडा आणि उदभवलेल्या समस्या यासंबधी माहिती दिली.कार्यकर्त्यांनी सुध्दा जागृत राहुन काम करावं अशा सुचना भाजपा कार्यकर्त्यांना देवुन ठाणे ग्रामीण तसेच शहरी भागाचा विकासासाठी आम्ही दोघेही हातात हात घालुन काम करत असल्याचे सांगितले.खासदारकीच्या निवडणुकी नंतर असेच कोरोनाच्या सात महिण्यानंतर प्रथमच खासदार कपील पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली मात्र केवळ कृषी विधेयक हँडबिल हातात देवुन प्रबोधनात संपली यापलीकडे कोणताही विकास मुद्दा समोर आला नाही.कामगार कायदा अद्याप आमलात झाला नसताना कारखानदार कामगाराना कामावरून काढुन टाकू शकत नाही तसेच परमन्टं कायमस्वरूपी कामगाराना कंपनी कामावरून काढु शकत नाही असे झाल्यास आम्हाला भेटावे अशी माहिती खा.कपील पाटील यांनी दिली.मुरबाड एमआयडीसी मधील तीन ते चार कारखानदारानी केंन्द्रातील कामगार कायदयाचा आधार घेवुन कामगाराना बाहेर काढले आहेत.केणत्याही खर्‍या खोटया तक्रारी वरून कामगाराना कारखानदार काढुन घरी पाठवत आहेत काही कंपन्या बंद करू पहात आहेत.याकडे खासदार कपील पाटील यांचे लक्ष वेधले असता कायदा अद्याप झाला नाही तर कामगाराना कसे काढले असे पाटील म्हणाले


Post a Comment

 
Top