0


BY - युवा महाराष्ट्र लाईव - मुंबई।

भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या, देवीरुपातील स्त्रीशक्तीचे दररोज पूजन होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची उद्यापासून सुरुवात होत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करताना सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाप्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन होईल, यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने व शक्यतो घरीच साजरा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत नागरिकांनी, देवीभक्तांनी उत्सवकाळात स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Post a comment

 
Top