0BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.महिलांच्या प्रश्नासंदर्भातील कामकाज तसेच कोविड-19 चे जगावरील व भारतावरील परिणाम तसेच त्यावरील उपाययोजना यासंदर्भात मिनिस्टर कौन्सेलर ब्रिटीश हायकमिशन श्रीमती कॅथी बज व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यात सविस्तर चर्चा झाली.यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कोविड महामारीमध्ये निर्माण झालेले विविध प्रश्न विस्तृतपणे मांडले. नैसर्गिक आपत्तीमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले. महामारीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र आणि केंद्र शासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे भारतामध्ये याचा प्रसार लवकर आटोक्यात आणण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व विधिमंडळ सदस्य महिलांच्या प्रश्नासंदर्भात अत्यंत संवेदनशील असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ.गोऱ्हे यांनी जागतिक प्रश्नाकडे पाहताना महिलांच्याही दृष्टीकोनातून पहावे व प्रगतीमध्ये कोणीही पाठीमागे राहू नये या युनोच्या या दशकाच्या ब्रीदवाक्याचा उल्लेखही केला.


Post a Comment

 
Top