0


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे |

तुम्ही सतत हात धुताय ना ? बाहेर जाताना तोंडाला मास्क, सोबत सॅनिटायझर ठेवताय ना? बाजारात जाताना सुरक्षित अंतरावर उभे राहता ना? कोरोना पासून स्वतःचे आणि पर्यायाने आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी तीन नियम पाळताय ना!  कंटाळा करू नका, शासन सांगत असलेल्या नियमांचे पालन करा. आरोग्य विभागाची टीम सर्वेक्षण करून गेली का ? त्यांनी तुम्हाला योग्य माहिती दिली का? असे प्रश्न विचारुन मुरबाड तालुक्याच्या मोहप गावातील  कुटुंबियांशी प्रत्यक्ष भेट देऊन   जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतला. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मुरबाड व शहापुर तालुक्यामध्ये भेटी देऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला.यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी  सरळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या मोहप गावाला भेट देऊन गावोगाव मोहीम कसा प्रकारे सुरू आहे याचा आढावा घेतला.या दोन्ही प्रशासकीय प्रमुखांनी संयुक्त दौरा करून प्रत्येक्ष गावकऱ्यांच्या घरी जाऊन माहीती घेतली. तसेच आरोग्य सर्वेक्षण टीमशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.दरम्यान त्यांनी सरळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, मुरबाड तहसीलदार अमोल कदम, आरोग्य सर्वेक्षण टीम, अधिकारी-कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a comment

 
Top