ब्रिटनचे उपायुक्त ॲलन गेमेल व मंत्रिपरिषदेच्या सदस्य कॅटी बज यांच्याशी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी साधला संवाद
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रात कायम अग्रेसर असून कोविड
काळातही मोठ्या प्रमाणात येथे परदेशी गुंतवणूक झाली आहे. याशिवाय पर्यटन वाढीच्या दृष्टीने
राज्यातील पर्यटन स्थळांवरही अधिक सोयीसुविधा पुरविल्या जात असून जास्तीत जास्त पर्यटकांसाठी
योग्य ती सुविधा पुरविण्याबरोबर स्थानिक रोजगार वाढविण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे, असे राज्यमंत्री कु.आदिती
तटकरे यांनी सांगितले.लॉकडाऊनकाळानंतर राज्यातील परिस्थिती पूर्ववत होत असतांनाच राज्यातील
उद्योग, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवकल्याण या विविध विभागांच्या माध्यमातून शासनाच्या
ध्येय धोरणाविषयी राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शुक्रवारी ब्रिटीश हाय कमिशनचे
उपायुक्त ॲलन गेमेल व मंत्रिपरिषदच्या सदस्य कॅटी बज यांच्याशी सदिच्छा भेटीअंतर्गत
दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
No comments