web-ads-yml-728x90

Breaking News

देवा ग्रुप चित्रपट संघटना भविष्यात ठरणार प्रभावी;मराठी तरूणांनो पुढे या,महाराष्ट्र धर्म वाढवा - रोहित गायकवाड

 

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |

आज महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात देवा ग्रुप फाऊंडेशनचे कार्य चर्चेत आहे.नेहमी समाजाचे हित व विकास करू पाहणार्‍या तरूण वर्गांची साथ देवा ग्रुप फाऊंडेशनला बळकट बनवित आहे.त्याच धर्तीवर असलेल्या देवा ग्रुप फाऊंडेशनच्या माध्यमातून लाखो तरूणांची शान अध्यक्ष सुजित (पप्याशेठ) ढोले,महाराष्ट्राचे लाडके मार्गदर्शक तथा देवा ग्रुप फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या अधिपत्याखाली देवा ग्रुप चित्रपट संघटना तयार करण्यात आली.या संघटनेच्या पुढाकारानेच आज अनेक चित्रपट सृष्टीतील कलावंत,अभिनेते जोडले गेले असून साधू संतांची शिकवण जोपासली जात आहे.अलीकडे प्रत्येक जिल्हयात देवा ग्रुप चित्रपट संघटनेत सर्व कलावंत,अभिनेते यांनी एकत्रित येऊन माणूसकी जपत मराठी तितुका मेळवावा,महाराष्ट्र धर्म वाढवावा हि जोपासणा जपली आहे.

            ठाणे जिल्हयातुन या देवा ग्रुप चित्रपट संघटनेची बहरदार सुरूवात केली असून या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पदी रोहित गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.त्यातूनच तरूणांनो पुढे या,अन महाराष्ट्र धर्म वाढवावा अशी संकल्पना प्रस्थापित करून भविष्यात ही संघटना प्रभावी ठरवू या असे प्रतिपादनही देवा ग्रुप चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रोहित गायकवाड यांनी केले आहे.दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर सर्व कलाकार,तंत्रज्ञ,लेखक,दिग्दर्शक,निर्माता तसेच चित्रपट क्षेत्रातील प्रत्येकाला सुवर्ण संधी मिळावी म्हणून ऑनलार्इन सभासद नोंदणी नाममात्र रूपयांनी सुरू केली आहे.या संघटनेच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीतील प्रत्येकांच्या अडचणी सोडविल्या जातील या दृष्टिकोणातून सर्व मराठी तरूणांनी पुढे येऊन अवघे धरू,एकमेकांस सहाय्य करू अशी मनोधारणा बाळगून असे आवाहन देवा ग्रुप संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रोहित गायकवाड यांनी केले आहे.

            मराठी उद्दयोजक पुढे जावा व उंचशिखर गाठून महाराष्ट्र धर्म जोपासावा,त्यासाठी मराठी उद्दयोजक कसा पुढे येऊ शकेल असे मार्गदर्शन देवा ग्रुप फाऊंडेशनच्या माध्यमातून देवा ग्रुप चित्रपट संघटनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रोहित गायकवाड यांनी दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर ऑनलार्इन सभासद नोंदणी करतावेळी केले आहे.यावेळी मराठी तरूणांना विविध विषय संदर्भ पटवून दिले असून चला उठा,अन सिध्द करा स्वःताला अन दाखवूया आपल्या महाराष्ट्राचा धर्म असा विश्‍वास रोहित गायकवाड यांनी आपल्या संभाषणात व्यक्त केले.यावेळी देवा ग्रुप चित्रपट संघटना ठाणे जिल्हाध्यक्षा जुर्इ खाडे,ठाणे शहराध्यक्षा स्वाती लंके,ठाणे शहर सांस्कृतिक विभाग अध्यक्षा डिंपल भोरपकर, पालघर जिल्हाध्यक्ष अभिजित ऐवळे,देवा ग्रुप ठाणे शहर सभासद महंत पवार तसेच देवा ग्रुप फाऊंडेशनचे सर्व जिल्हास्तरीय सभासद उपस्थित होते.

 

No comments