web-ads-yml-728x90

Breaking News

डॉ.किरण झंवर (डॉ.महेश्वरी) यांचे गोरगरिबांना मदतीचा हात...

 

BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव- मुरबाड |

मुरबाड जेव्हा घडले त्या घडलेल्या गावाचे शहरीकरण झाले.त्यामध्ये अनेक विषय बाबी डोळयासमोर आले असता त्या काळापासून ते आजतागायत 2020 चा काळ यामध्ये अनेक डॉक्टर मुरबाड शहराला,तालुक्याला लाभले त्यातील अनुभवी,माणसातील माणूस देवमाणूस,आणि गारगरिबांना मदतीचे हात देऊन मायेची सावली देणारे डॉ.किरण झंवर हे एक नाव आहे.डॉ.किरण झंवर यांना डॉ.माहेश्‍वरी म्हणून ओळखले जाते.त्यांचे अनुभव आजारी रूग्णाला उभा करून त्यांना जीवनदाब देणारा अमुल्य घटकच म्हणावे लागेल.1989 पासून त्यांचे माहेश्‍वरी हॉस्पिटल आजही रूग्णांच्या सेवेला तत्पर आहे.डॉ.माहेश्‍वरी यांनी कधीही पैसा कमिवण्यासाठी डॉक्टरकी नाही केली तर गोरगरिबांची केलेली सेवा हीच र्इश्‍वर सेवा आहे असे विचार त्यांचे सर्व मुरबाड तालुक्याला भाऊन जातात त्यामुळे उपचारासाठी आलेल्या गरिबाकडे पैसे नसल्यास त्यांची काळजी घेऊन बरे करणारे डॉ.माहेश्‍वरी यांनी मोफत उपचारही केले आहेत.माणसाचे दोन रूप असतात एक म्हणजे चांगला आणि दुसरा वार्इट परंतू डॉक्टराचे केवळ एकच रूप आहे ते म्हणजे "देवरूप" त्यामुळे मरणाच्या दारातील प्रत्येक व्यक्तीला वाचविण्यासाठी डॉक्टराचे योगदान हे महत्वपुर्ण मानले जात आहे.अशावेळी मुरबाडचे डॉ.माहेश्‍वरी यांनीही कोणतीही कसरत सोडली नाही.गोरगरिबांच्या उपचारासाठी आणि मदतीसाठी धडपड करणारे डॉ.किरण झंवर यांनी कोरोना प्रादुर्भाावातही नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आपले कार्य बेभानच ठेवले आहे.डॉ.माहेश्‍वरी यांचेकडे मुरबाड तालुकाच नव्हे तर इतर तालुक्यातून रूग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात.त्यांची भुमिका निर्भिड आणि निस्वार्थी असल्याने कोणताही विषय गंबीर तिथे डॉ.महेश्‍वरी खंबीर असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.शासनांच्या नियमाचे पालन करित अनेक नागरिक,रूग्णांना कोरोनामध्ये मार्गदर्शन करून माझे कुटूंब माझी जबाबदारी अशी जनजागृती करून दिली आहे.त्यांच्या कार्याची प्रशंसा जितकी करावे तितके कमीच आहे.डॉ.माहेश्‍वरी यांना कोरोना योध्दा भुमिका साकारून प्रत्येक आपले कर्तव्य पार पाडले आहेत.नेहमी हसरा चेहरा समोर ठेवून इतरांच्या मनातील दुखःच्या भागाला संपवून त्यांचे चेहर्‍यावर हास्य फुलविणारे तसेच त्यांच्या कार्यात,जबाबदारी,कर्तव्य,भुमिकेतून कधीही माघार न घेणारे डॉ.किरण झंवर (डॉ.माहेश्‍वरी) यांची चर्चा संपुर्ण मुरबाड तालुक्यासह जिल्हयात होत आहे.

 

 

No comments