0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

जम्मू काश्मीर मध्ये 2002 साली शहीद झालेले हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील जवान कवीचंद परसराम भालेराव (बीएसएफ) यांच्या मातोश्री रुख्मिनबाई भालेराव यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी एक विशेष बाब म्हणून ‘आऊट ऑफ द वे’ जाऊन मदत केली आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतील दारिद्रय रेषेची अट व वयोमर्यादा या दोन्ही अटी शिथिल करत त्यांना 4 एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य शासन देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांच्या सदैव पाठीशी असून त्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नसल्याचे यावेळी श्री. मुंडे म्हणाले. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत श्रीमती रुख्मिनबाई भालेराव यांना तातडीने जमीन उपलब्ध करून देण्याबाबत हिंगोलीचे जिल्हाधिकारी तसेच समाज कल्याण सहायक आयुक्त यांना शासन निर्णयाद्वारे आदेशित करण्यात आले आहे.

Post a comment

 
Top