0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

राज्य शासनाने मराठी भाषा दिनानिमित्त यावर्षी २७ फेब्रुवारी २०२० रोजी महात्मा गांधींच्या ‘अनमोल वारसा’ या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे. हा ग्रंथ सर्व शासकीय ग्रंथागारे तसेच प्रत्येक जिल्ह्यातल्या अधिकृत विक्रेत्यांकडे विक्रीला उपलब्धही आहे. असा खुलासा मराठी भाषा विभागाने केला आहे. आज दै.लोकसत्ता या वृत्तपत्रात ‘कर्मभूमीतच महात्मा गांधींच्या चरित्राची परवड’ या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित झाले आहे. त्यावर विभागाने खुलासा केला आहे.

तब्बल ३० वर्षे पडून राहिलेले काम साहित्य संस्कृती मंडळाने गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षात उत्तमरित्या परिपूर्ण केले आहे. याबाबतचा तपशील मंडळाच्या फेसबुकवर https://www.facebook.com/108172401050073/posts/111175997416380/?flite=scwspnss या लिंकवर उपलब्ध आहे.

Post a Comment

 
Top