लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई
‘लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार’ असा ध्यास असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दि. 27 ऑक्टोबर 2020 ते 02 नोव्हेंबर 2020 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह-2020’ साजरा करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा सप्ताह संपूर्ण देशभर साजरा करण्यात येत आहे. सुजाण नागरिकांनी तसेच अन्य कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, मुंबई, येथे संपर्क साधावा, असे आवाहन या सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबईचे अपर पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी केले आहे.
No comments