0


BY - युवा महाराष्ट्र लाईव - मुंबई।

 संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायबर क्राईममध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये अनेक तरुण मुले आणि मुली गुंतत आहेत व  अनेक टोकाच्या भूमिका ही घेत आहेत. महिला आणि बालकांसंदर्भातील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींबाबत सामाजिक उत्तरदायित्व मोहीम राबवावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.सायबर गुन्ह्यातील महिला सुरक्षेबाबत तसेच राज्यातील बेपत्ता झालेल्या महिलांच्या प्रश्नासंदर्भात आणि रेल्वे प्रवाशांमधील महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याबरोबर वेबिनारचे आयोजन करण्यात आले. उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पोलिसांना सूचना देताना ई-मेलद्वारेही जर महिलांनी  तक्रारी केल्या तर त्याबाबत तात्‍काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू करावा. मॅट्रिमोनियल साईटवरील खोटी माहिती देऊन मुलींना फसविणे व त्यांचावर लैगिक अत्याचार करणे तसेच लहान मुले व मुलींवर लैंगिक अत्याचार  याची संख्या वाढलेली आहे. लहानमुलांवर होणारे संस्कार महत्वाचे असल्याने त्यांना सायबर क्राईमबाबत आवश्यक प्रशिक्षण देणेबाबत प्रयत्न करावेत. यामध्ये अनेक सामाजिक संघटना काम करतात. त्यांना या प्रशिक्षणामध्ये समाविष्ट करावे. तसेच हे प्रशिक्षण सर्व पालकांनाही द्यावे. दि 14 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत सायबर सुरक्षा व महिला हिंसाचार विरोधी प्रशिक्षण सप्ताह सुरू करावा, असेही डॉ. गोऱ्हे यांनी निर्देश दिले.

Post a Comment

 
Top