web-ads-yml-728x90

Breaking News

औरंगाबाद जिल्ह्यातील विजेच्या मागणीचा विचार करून वीज यंत्रणा सुधारणेचा आराखडा करा – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे निर्देशBY -  युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील उद्योग, नागरी आणि शेतीसाठीची भविष्यातील विजेची मागणी लक्षात घेऊन विद्युत यंत्रणेतील विकासाचा आराखडा करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.यामुळे पुढील काळात उद्योगांना सुरळीत वीज मिळणार असल्याने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच शेतीसाठी आणि नागरी तसेच ग्रामीण भागातील वीजपुरवठाही विनाव्यत्यय होण्यास मदत होईल.औरंगाबाद जिल्ह्यातील वीजेच्या प्रश्नांवर पालकमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.औरंगाबाद जिल्ह्यातील कृषीपंपाना अनियमित वीज पुरवठा, अनेक ठिकाणी रोहित्रे नादुरूस्त तसेच रोहित्रांसाठी ऑइलची कमतरता आदी समस्या यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधीनी मांडल्या. औरंगाबाद शहरातील 33 केव्ही उपकेंद्रांना अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी पडेगाव येथे 220 केव्ही वाहिनी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अंबादास दानवे यांनी केली. कन्नड विभागाचे विभाजन करून सिल्लोड विभागाची निर्मिती करणे आदी मागण्या यावेळी लोकप्रतिनिधींनी मांडल्या.


No comments