web-ads-yml-728x90

Breaking News

शहापुर हद्दीत महामार्ग पोलीस मदत केंद्र अधिकारी व कर्मचारी यांचे कडून वाहन चालकांना मास्क वाटप

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - शहापुर

मा.अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) साहेबांच्या सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने मिळालेल्या सूचनेप्रमाणे तसेच मा.पोलीस अधीक्षक साहेब, महामार्ग पोलीस, ठाणे  परिक्षेत्र , मा पोलीस उपअधीक्षक,मा. पोलीस निरीक्षक ,म. पो.वि. ठाणे  यांचे मार्गदर्शनाखाली आज दि 27/10/2020 रोजी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.03 वर, महामार्ग पोलिस मदत केंद्र शहापुर हद्दीत महामार्ग पोलीस मदत केंद्र अधिकारी व कर्मचारी यांचे कडून  वाहन चालकांना मास्क वाटप करण्यात आले.

बिना मास्क वाहनधारकांना मास्क वाटप करून त्याचे महत्व पटवून दिले. तसेच न वापरल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देण्यात आली.वाहन चालवताना मोबाईल वापर न करणे, मद्य प्राशन  न करणे,सीटबेल्ट लावणे इत्यादी बद्दल मार्गदर्शन केले.सर्व अवजड वाहने महामार्गावरून डाव्या बाजूने चालविणे .तसेच कोणत्याही कारणास्तव महामार्गालगत वाहने उभी करून न ठेवता , हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंप किंवा रिकामी मैदाने अशा ठिकाणी सुरक्षितपणे थांबविण्याच्या सूचना दिल्या.

सर्व वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन केले आणि कोरोना परिस्तिथी बद्दल अवगत करवून स्वतः ची काळजी आणि खबरदारी घेण्याबद्दल प्रबोधन करण्यात आले.

No comments