web-ads-yml-728x90

Breaking News

आपत्तीग्रस्तांना मोफत शिधावाटप करणार – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

महाराष्ट्रात विविध भागात पावसाने थैमान घातले. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातील अनेक भागांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार  शरद पवार हे भेटी देत आहेत. त्याचप्रमाणे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. ज्यांचे घर पाण्याखाली बुडाले, काही ठिकाणी घरे वाहून गेलेली आहेत, अनेकांची शेती वाहून गेली आहे अश्या निराधार कुटुंबाना मोफत अन्नधान्य पुरवठा करणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण  मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

 

No comments