0

BY – ( मर्डर स्टोरी कव्हरींग - कुणाल शेलार ),युवा महाराष्ट्र लाइव,मिरारोड |

आजच्या युगात फसवणूकीचा विषय हा छोटा राहिला नसून सामान्य व्यक्ती हा फसवणूकीला बळी पडू लागला आहे.फसवणूकीच्या गळा टाकला जातो जो अडकला तो फसला आणि जो फसला तो रडला ही वास्तविकता असल्याने फसवणूकीपासून वाचा अशी जनजागृती केली जाते परंतू गळ टाकला तर तो अडकणारच त्याला पर्याय नसतो परंतु जेव्हा फसवणूककर्ता पोलिसांच्या जाळयात अडकतो तेव्हा त्याची सुटका होत नाही हे कायदेलिकीत सत्यच आहे.अशीच फसवणूकीच्या गुन्हयाची उकल करता करता एका तरूणीच्या खुणाचा शोध लावण्यात मात्र काशिमीरा पोलिसांना यश आले आहे.


          फसवणुकीचे दोन सुत्रधार एक म्हणजे आशिष उकानी व दुसरी म्हणजे त्याची पत्नी निकीता दोषी उर्फ निकीता आशिष उकानी.या दोघांचे संगनमत एका ट्रान्समार्ट कंपनीनीची फसवणूक करणारी ठरली आहे.यामधील फिर्यादी लितेश सुभाष शेठे,रा.अंधेरी यांचे कंपनीकडून मैत्रिण ऑनलार्इन प्रा.लि.यांना एकून 4 स्वॅप क्रेडिट कार्ड मशीन पुरवण्यात आले होते.मैत्रिण कंपनीचे डायरेक्टरच आशिष उकानी व दुसरी म्हणजे निकीता दोषी हे होते.या दोघांनी फसवणूक करण्याची रचना रचली त्या रचनेत ट्रान्समार्ट डिजीटल प्रा.लि.कंपनीचे क्रेडीट कार्ड मशीनद्वारे एका मशीनवरून इनव्हाइस बेसड पध्दतीचा वापर करून शोभित कुमार यांचे क्रेडीत कार्डचा वापर करण्याचे ठरविले.कार्डचे लिमीट 29 हजार इतके असताना चक्क त्या कार्डाचा वापर करून 15 लाख 65 हजार 900 रूपयाचा व्यवहार करून बँकेतून नमूद रक्कम काढून ट्रान्समार्ट कंपनीला लुटुन त्यांची फसवणूक केली.फसवणूकीची काशिमीरा पोलिस ठाण्यात भा.दं.वि.420,34 प्रमाणे 15/12/2019 रोजी गुन्हा ही नोंद झाला.आशिष उकानी व दुसरी म्हणजे त्याची पत्नी निकीता दोषी उर्फ निकीता आशिष उकानी यांनी गुन्हा नोंद होण्यापुर्वीच मिरा भाईंदर परिसर सोडून पळ काढला.हे दोघं फसवणूक झाल्यानंतर तेथिल परिसर सोडून सतत दुसरे ठिकाणी जाऊन आपले राहणी ठिकाण बदलायचे.परंतू यंदा काय त्यांची डाळ शिजली नाही.काशिमीरा पोलिसांनी आपली यंत्रणा सज्ज केली आणि शोधाची सुरूवात केली ती त्या दोघांच्या तांत्रिक माहितीद्वारे.शोध लागला.ठिकाण मिळाले गुजरात राज्यातील सुरत मधील.पोलीस आयुक्त सदानंद दाते,अप्पर पोलीस आयुक्त एस.जयकुमार,मि.भा.व.वि.आयुक्तालय विजयकांत सागर,पोलीस उपायुक्त मिरा भाईंदर विलास सानप,सहा.पोलीस आयुक्त मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली काशिमीरा पोलीस सज्ज झाली.मिळालेल्या आणि प्राप्त झालेल्या माहिती प्रमाणे तुकडी सज्ज करून काशिमीरा पोलिस त्या ठिकाणी पोहोचले.तेव्हा आशिष उकानी हा तेथे मिळून आला त्याची पत्नी निकीता दोषी उर्फ निकीता आशिष उकानी ही मिळाली नाही.आशिष उकानी याला पोलिसांनी 11/10/2020 रोजी अटक करून 21/10/2020 पर्यंत पोलिस कस्टडीत ठेवले आहे.


          काशिमीरा पोलिसांनी आशिष उकानी यास कस्टडीमध्ये घेऊन त्याची पत्नी निकीता दोषी उर्फ निकीता आशिष उकानी हिचे बाबत चौकशी करून माहिती विचारण्यास सुरूवात केली तेव्हा आशिष उकानीने दिलेल्या कबूलीवरून त्याची पत्नी निकीता दोषी उर्फ निकीता आशिष उकानी सविस्तर माहिती सांगण्यात सुरूवात केली.त्यात त्याने सप्टेंबर 2019 मध्ये निकीताला घेऊन वेलेंजा,सुरत येथे दोघं आरोपी राहण्यास गेले.एक महिना दोघं तेथेच राहिले त्यानंतर ते 13/10/2019 रोजी दुपारी आरोपी आशिष उकानी हा निकीता आशिष उकानीला हेक्सा गाडी (गाडी.क्र एम.एच.04.जे.व्ही.9660) ने मुळगावी अमरेली येथे गेला.त्यानंतर 14/10/2019 रोजी दुपारी अमरेली बस स्टॉपवर थांबले.15/10/2019 पहाटे 2 वाजता निकीताला घेऊन सेलना,गुजरातला गेला.तेथे त्यानी दारू पिण्यास सुरूवात केली.रात्रभर दारू पिऊन सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास आरोपी आशिष उकानी व दुसरी म्हणजे त्याची पत्नी निकीता दोषी उर्फ निकीता आशिष उकानी यांचे चकमकीने भांडने सुरू झाली त्या भांडणात गाडी आणि पैशाचा विषय रंगला.आरोपी आशिषच्या डोक्यात दारू घुसली आणि त्यांच्या पत्नीला ठार मारण्याच्या उद्देशाने पाऊल टाकले,शेजारी भलीमोठी विहीर होती डोक्यातील खुळ कमी होर्इना अचानक मस्तकाचा पारा चढला आणि त्याच्या पत्नीला शेजारील विहीरीत ढकलून दिली.निकीता विहीरीत पडली बचावासाठी प्रयत्न चालू केले परंतू तिला पाण्यात पोहोता आले नाही म्हणून तिची हार झाली आणि मृत्युला सामोरी गेली.काही कालावधीनंतर निकीता स्तब्ध झाली.तेव्हा आशिष याने सापळा रचून खुनाचा कलंक पुसण्यासाठी हातपाय मारले.रचना आखली,गावात गेला आणि गावातून दोरी आणून बुध्दी लढवून निकीताचे प्रेत बाहेर काढण्याची हालचाल करू लागला.अखेर त्याने निकीताच्या प्रेताला बांधून दोरी गाडीला बांधली,गाडी पुढे सरसावली आणि प्रेत विहीरीच्या बाहेर आणले.आता खुनामध्ये मी लटकणार त्यासाठी शैतानी बुध्दी लढवली.बुध्दीच्या सुचनेप्रमाणे अलीकडे बाजुला एका शेतात खड्डा खोदला.प्रेत आणले त्या खड्डयात टाकले व त्यावर मीठ टाकूण प्रेताला पुरले.सदरची माहिती सांगतांना घडला काय आणि समोर काय आले असा प्रकार आरोपीच्या कबुलीवरून काशिमीरा पोलीसांसमोर आले.काशिमीरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व स्टाफ टीम वरिष्ठांच्या परवानगीने आरोपी आशिषने घडवलेल्या गुजरातच्या घटनास्थळी पोहोचली.आशिष उकानी याने जिथे निकीता उकानीला गाढले तेथे दाखविले.खात्री करून दाखविलेल्या ठिकणी मॅजिस्ट्रेट,फॉरेन्सीक एक्सपर्ट,पंच,स्थानिक पोलीस यांचे खात्री करून निकीताची जमिनीत पुरलेली देथबॉडी मिळाली.कायदेशीर बाब पुर्ण करून काशिमीरा पोलीस ठाण्याचे सपोनि.राजेंद्र चंदनकर यांनी आरोपी आशिक उकानी विरोधात भा.दं.वि.कलम 302,201 प्रमाणे वंडा पोलीस स्टेशन,अमरोली,गुजरात राज्य येथे फिर्याद देवून खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.काशिमीरा पोलीसांच्या धडाकेबाज कामगिरीची सर्वत्र महाराष्ट्रात चर्चा होत असून महाराष्ट्र शासन पोलीसांचा अभिमान बाळगला जात आहे.त्याचबरोबर या तपासाचे मानकरी पोलीस आयुक्त सदानंद दाते,अप्पर पोलीस आयुक्त एस.जयकुमार,मि.भा.व.वि.आयुक्तालय विजयकांत सागर,पोलीस उपायुक्त मिरा भाईंदर विलास सानप,सहा.पोलीस आयुक्त मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चंदनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन पोतदार,पो.शि./2087 राहुल दाभाडे,पो.शि./2938 संतोष तायडे,पो.शि./1161 स्वप्नील मोहिले यांनी सापळा रचून फसवणूकीच्या गुन्हयातून खुनाच्या गुन्हयाचा तपास लावला त्याबद्दल गुन्हेगार कितीही चालाक असला तरै महाराष्ट्र शासन पोलीस गुन्हयातील गुन्हेगाराला कायदेची शिक्षा सुनावतातच हे या घडलेल्या घटनेतून सिध्द झाले आहे.

  

Post a Comment

 
Top