मुंबईत वीजपुरवठा ठप्प होण्यावरून राज्य सरकारने नेमली चौकशी समिती
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई
मुंबई आणि एम एम आर परिसराचा वीज पुरवठा ठप्प होण्याप्रकरणी
तांत्रिक चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई
केली जाईल, असा इशारा ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिला.ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी
प्रकाशगड या ऊर्जा विभागाच्या मुख्यालयात मुंबईतील वीज ठप्प होण्याच्या घटनेवर सखोल
चर्चा केली. या बैठकीला महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांचे व्यवस्थापकीय
संचालक, संचालक उपस्थित होते.
No comments