web-ads-yml-728x90

Breaking News

‘कोविड कवच मोबाईल ॲप’ सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेणे आवश्यक – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

कोविड -१९ रुग्णांबाबतची सर्व माहिती मिळण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘कोविड कवच मोबाईल ॲप’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज मंत्रालयात ऑनलाईन पध्दतीने ‘कोविड कवच मोबाईल ॲप’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सर्व अधिष्ठाता उपस्थित होते. जीवन ज्योत कॅन्सर अँड रिलीफ केअर ट्रस्टचे हरकचंद सावला, शस्त्र लॅब्सचे सुनील नायर, शस्त्र लॅबचे हेल्थकेअर कन्सल्टंट विजयकुमार अय्यर, शिवांगी कुंभार यांच्या प्रयत्नाने कोविड कवच हे ॲप तयार करण्यात आले आहे.

No comments