"नाका बांधकाम,घरकाम कामगारांची "निर्धार बैठक संपन्न
BY - युवा
महाराष्ट्र लाइव - उल्हासनगर
असंघटीत कष्टकरी कामगार संघटना,आयोजित निर्धार बैठकीत नाका
बांधकाम,घरकाम व इतर 50 कामगारांच्या उपस्थित पार पडली, या बैठकीत असंघटीत कामगार यांची
1996 च्या कायद्या अंतर्गत नोंदणी तात्काळ व्हावी नोंदणीकृत कामगारांना योजना चा लाभ
मिळावा...कोविड19 प्रादुर्भाव मुळे महाराष्ट्र सरकारने सरसकट असंघटीत कामगारांना आर्थिक
मदत करावी अशा अनेक मागण्या सम्बधी चर्चा करण्यात आली.या प्रसंगी असंघटीत कामगार
कार्यालयाचे उदघाटन भारतीय संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून करण्यात आले.तर नाका बांधकाम महिला कामगार बेबी
नाईक यांच्या हस्ते फित कापण्यात आली..तेंव्हा अनेक कामगार उपस्थित होते,या कार्यालयाद्वारे
असंघटीत कामगारांना हेल्पलाईन असंघटीत कामगार आणि कौटुंबीक समुपदेशन करण्यात येणार
आहे...अशी माहिती संघटनेचे महाराष्ट्र सचिव उत्तम साबळे यांनी कामगारांना दिली आणि असे प्रखर पणे मत मांडले कीं कितीतरी संकट
आलेत तरी आपण डगमल नाही पाहिजे सतत संघर्ष करावा लागेल कारण आपल्या वरील संकट कमी होतांना
दिसत नाहीत, त्यामुळे हार मानण्याची गरज नाही.. संघटनेचे उपाध्यक्ष विष्णू सोनवणे यांनी आपल्या भाषणात असें सांगितले कीं कामगारांनी नियमित
बैठक सभा उपस्थित राहावे त्या शिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही आणि संघटनेचे सभासद
नियमित होणे गरजेचे आहेत....हें कामगारांचे कार्यालय आहे जें सर्वां करिता खुल असणार
आहे..
हीं बैठक दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11 00 ते 2:30 वाजता संघटनेचें केंद्रीय कार्यालय
म्हरळगांव ता. कल्याण जि ठाणे येथे संपन्न झाली.यात तोंडाला मास्क आणि शारीरिक अंतर
ठेवून कामगारांनी सहभाग घेतला.
संघटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर,अंबरनाथ,कल्याण
या महानगरपालिका क्षेत्रात कामगार नाका आणि
वस्ती मध्यें संघटनात्म काम करत आहे.या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक संघटनेंचे अध्यक्ष
सुनील अहिरे ,उपाध्यक्ष विष्णू सोनवणे सचिव उत्तम साबळे शहर प्रमुख मीरा सपकाळे,सुनील
माळी उपस्थित होते,तर या बैठकीत प्रमुख उपस्थिती संविधान प्रचारक
नागेश जाधव, अनुराधा, शीतल, आणि सहेर सामाजिक संस्थेचे प्रमुख प्रशांत बागुल,
वैशाली कांबळे उपस्थित होते गुंफा बाई सुरडकर,विजय दाभाडे,भानुबाई पवार,सबिना डिकोस्टा,
पोपट कांबळे, पद्माकर अहिरे,रामभाऊ जाधव, राहुल पवार , शशिकांत भालेराव,फेकू सहानी
पंढरीनाथ पेटारे,लता बोटे,संध्या केदार प्रज्ञा बागुल अर्चना अहिरे,अलका ब्राम्हणे
सुलोचना पवार या कामगारांनी सहभाग घेतला.
No comments