0

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |

केंद्रीय दक्षता आयोगाच्या सुचनेनुसार दि. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२० या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत आज  अधिकारी-कर्मचारी यांनी भ्रष्टाचार निर्मूलन शपथ घेतली. यावेळी राज्याचे राज्यपाल श्री. भगत सिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री  श्री. उद्धव ठाकरे यांनी दिलेला संदेश वाचून दाखविण्यात आला. 

          सामान्य प्रशासन विभागात उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन) अजिंक्य पवार यांनी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना शपथ दिली. त्याचबरोबर उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवारउप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) छायादेवी सिसोदेमुख्य लेखा व वित्त अधिकारी सुभाष भोरकार्यकारी अभियंता ( बांधकाम ) नितीन पालवेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघेशिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) शेषराव बडेशिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) समिना शेखजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मन पवारकार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा एच. एल. भस्मे,  समाजकल्याण अधिकारी रमेश अवचारमहिला व बाल विकास विभाग आदि विभागप्रमुखांनी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली.

Post a comment

 
Top