web-ads-yml-728x90

Breaking News

महिला व बालकल्याण योजनांचे प्रभावी कार्यान्वयन करण्याची राज्यपालांची सूचना

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

महिलांच्या तसेच बालकांच्या सक्षमीकरणाबाबत राष्ट्रपती व पंतप्रधान विशेष आग्रही आहेत. यास्तव महिला व बाल कल्याण विभागाने आपल्या विविध राज्यस्तरीय तसेच केंद्र सहाय्यित योजनांचे प्रभावी कार्यान्वयन करून देशापुढे आदर्श निर्माण करावा, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केली.महिला सुरक्षा, पोषण आहार व आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना अतिशय चांगल्या आहेत, मात्र योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधून मधून प्रत्यक्ष भेट देऊन देखरेख करावी, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

No comments