0

 

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव- मुरबाड |

शासनानी शेतकर्‍यांसाठी पिक विमा योजना लागू केली असून ती पिक विमा योजना गेल्या 3 ते 4वर्षापासून अद्दयाप तरी मुरबाड तालुक्यातील काही गावांना मिळालेली नाही.कष्टकरी शेतकरी यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून असताना अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होते अशातच त्यांच्या पिकाचे विमा भरपार्इ म्हणून मिळतो परंतू मुरबाड तालुक्यातील अनेक गावातील शेतकर्‍यांना गेल्या काही वर्षापासून नुकसान भरपार्इ मिळाली नसून पीक विमा भेटली नसल्याचे शेतकरी संजय दशरथ भोर्इर यांनी आमच्याशी बोलतांना म्हंटले आहे.कोरोना यावर्षी होतो मागील वर्षी काही नसताना पिक वीमा का मिळाला नाही,पंचनामे तात्काळ होत नाहीत तलाठी दखल घेत नाही,वारंवार अर्ज तसेच फोनद्वारे माहिती कळविली जाते परंतू नुकसान भरपार्इचा कागद शासकीय दफ्तरी पडून राहतो याकडे मुरबाड तहसिलदार,ठाणे जिल्हाधिकारी यांनी लक्ष वेधणे गरजेचे ठरेल.तलाठी स्वतः अंगावरील कामे बाजूला सारून शासनानी ऑनलार्इन यंत्रणा सुरू केले असून शेतकरी वर्गांनी पीक विमा अर्ज फोटो सहीत त्या दिलेल्या इमेल वर पाठवावे असे सांगितले जाते परंतू शेतकरी जर ऑनलार्इन शिकला असता तर तो शेतकरी कशासाठी राहिला असता असा सवालही संजय दशरथ भोर्इर यांनी शासनाला केला आहे.वारंवार तक्रार,निवेदन,भेटीगाठी घेतल्या जातात परंतू दखल घेण्यासाठी वेळ मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.त्यासाठी ऑनलार्इन यंत्रणा तलाठी यांनी गावोगावी जाऊन केली पाहिजे तसेच तलाठयांना त्या त्या गावाला दररोज एक भेट देऊन तेथील शेतकरी तसेच अन्य गावकर्‍यांच्या समस्या जे तलाठी यांच्या अंतर्गत येतात ते जाणून घेऊन त्यांच्या तक्रारीवर निराकरण काढले पाहिजे यासाठीही आता शेतकरी यांची मागणी जोर धरू लागली आहे.मुरबाड मुख्य ठिकाण असून कोसोदूर वरील शेतकरी मुरबाडमध्ये नाही येऊ शकत म्हणून तलाठी यांनीच दररोज गावात भेट द्दयावी अशी मागणी संजय दशरथ भोर्इर यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना आमच्या प्रसिध्दीमाध्यमाद्वारे केली आहे.त्याचबरोबर शेती नुकसान पंचानामे करून,पीक विमा योजनेचा निधी आम्हास तात्काळ उपलब्ध करून द्दयावा त्यासाठी आम्ही शेतकरी वर्ग थेट मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री यांचेकडे जाऊन भेट घेऊन आमच्या समस्या मांडणार असल्याची माहिती संजय दशरथ भोर्इर यांनी केली आहे.

 

Post a Comment

 
Top