0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – उस्मानाबाद/तुळजापूर

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला आलो असून या भागातील शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. परंतु शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. सरकार म्हणून आम्ही सर्वशक्तीपणाला लावून त्यांना मदत करून पुन्हा उभे करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिला.तुळजापूर तालुक्यातील कात्री या गावी अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची व खरडून वाहून गेलेल्या जमिनीची दि.२१ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांनी पाहणी केली. गावातील शेतकऱ्यांशी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात संवाद साधुन त्यांना धीर दिला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, कात्रीचे सरपंच किशोर गोडगिरे, अपसिंगाचे सरपंच वैशाली गोरे, उपसरपंच दिपक सोनवणे आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

 
Top