कल्याणच्या पोलीसांच्या गाडया उचलल्या जात नाही गरिबांच्या गाडया मग का उचलतात ,न्याय हा सर्वांना समान पाहिजे ; गुंडगिरी थांबवा - कुणाल शेलार
BY
- केदार नार्इक,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याण
शहारामध्ये कोर्टाजवळील तहसिलदार कार्यालयाबाहेर गाडया काही कालावधीपुरता विनापार्क
झोन मध्ये उभे केल्या जातात.या पार्कींग मध्ये सर्वसामान्य जनता तहसिल कार्यालयात कोणत्या
ना कोणत्या कामकाजासाठी येत असतात याच अवैध पार्किंगमध्ये काही पोलीसांच्या दुचाकी
वाहनांचा समावेश असतो परंतू ट्राफीक पोलीस गुंडगिरी वृत्तीचे मुलं घेऊन गाडी उचलगिरीचा
प्रकार करतांना दिसत असताना गोरगरिबांची दुचाकी वाहने उचलून नेतात परंतू ज्या गाडीवर
पोलीस लिहले जाते त्या गाडींना त्याच ठिकाणी ठेवून दबंगशाहीचा आणि गुंडगिरीची भाषा
वापरून अन्याय प्रविष्ट प्रकार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन जवळ विनापार्क झोन
ठिकाणी गाडया लावल्या जातात त्यांच्यावर कारवार्इ करणे हे वाहतूक गर्दी होऊ न देणे
हे योग्यच परंतू पोलीसांनी पोलीसांच्या गाडयाची उचल करू नये असा कायदा तर नाही ना
? त्यासाठी प्रथम पोलीसांनी प्रथम पोलीसांच्या दुचाकी उचलावे आणि गुंडगिरी प्रवृत्तीची
पोरं घेऊन फिरणे टाळण्यासाठी सशक्त पाऊल उचलावे अशी मागणी सध्या जोमाने केली जात आहे.कोरोनामुळे
संपुर्ण देश झोपला,गरिब जनतेचे इकडे आड तिकडे विहीर होत असताना त्यांना दिला देणे योग्य
त्यांची परिस्थिती सुधारणे योग्य येथे जनतेचीच लूट केली जात आहे.कल्याण मध्ये सध्या
हीच लूट चक्क गुंडगिरी वृत्तीचे पोरं व ट्रॉफिक पोलीस आपल्या मनमानीने करित असताना
दिसत आहे.यावर आळा घालण्यासाठी कमिश्नर व जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षीकांनी सढळ पाऊल
उचलले पाहिजे तेव्हाच न्यायाची भूमिका साकारता येर्इल.जनतेच्या गाडी विनापार्कींग झोनमध्ये
पोलीसांची गाडीच राहते परंतू गरिबाची गाडी उचलून नेवून पावती फाडून कायदा शिकवले जाते
परंतू पोलीसांनी प्रथम पोलीसांना कायदा शिकवावा नंतर जनतेकडे बोट दाखवावे असा सल्ला
युवा पत्रकार कुणाल शेलार,अॅड किरण थोरात यांनी मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना दिला
आहे.
No comments