web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडमधील गुटखा डिलरच्या गुटखा विक्रीत वारसदारांचा धुमाखुळ ; पोलिस प्रशासनाचे त्यांना कवच...

 

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव- मुरबाड |

मुरबाडच्या पानटपर्‍या रंगल्या असून त्या पानटपर्‍यात गुटखा धंदा हा सर्रासपणे सुरू आहे.काय कारवार्इ,कोण प्रशासन,कोण काय वाकडं करणार,हप्ते बांधले असे एैकायला मिळत असून अनेक तरूण या गुटख्याच्या चकोटयात अटकले आहेत.त्यांना बाहेर काढण्यासाठी तेव्हाचे सरकारही अपयशी होते आणि आत्ताचे सरकारही अपयशी झाले आहेत.गुटखा डिलरच्या वारस कोण? गुटखा विक्री धंद्दयाला जबाबदार कोण याचा शोध घेण्याएैवजी प्रशासन सुस्त बसली आहे.नठ्ठु थैली उटतो आणि गुटखा धंदा करण्यास सुरूवात करतो.मुरबाड तालुक्यात सध्या गुटखा धंद्दयाचा वापर मोठया प्रमाणात होतांना दिसुन येत आहे.रस्त्यात विमल,माणिकचंद कंपनीच्या गुटख्याने जोर धरला असून पोलिस प्रशासनांनी चौकशी अंतिम कारवार्इ करून अटक करण्याएैवजी त्यांचे कवचबिंदू झाले आहेत.ठंडयावाल्याचा गुटखा बंद केला परंतू इतरांचा काय अशी ओरड काही महिण्यापुर्वी गुटखा विक्री करणाराच म्हणत आहे.आंबिवलीची गुटख्याची गाडी संतोषी माता मंदिर जवळ खाली होते,भारत बेकरीची गाडी नगरपंचायतीच्या खालील 3 गोडावून मध्ये खाली होते,मच्छिमार्केट मधील नाशिकमार्गे शेणव्याची वेफरची भरलेली गाडी वारसदाराच्या जनरल स्टोअर्समध्ये खाली होते याच वारसदाराचा दुसरा गोडाऊन लॅन्डस्केपला आहे तिथे अर्धा गुटखा उतरवला जातो,कधी पिठाच्या चक्कीजवळ गोडाऊन तर कधी अन्य ठिकाणी खाली होतो.रात्री 11.45 वाजेची गाडी सकाळी 6 वाजता खाली होते अशी माहिती जर एखाद्दयाला कळते तर पोलिस प्रशासनाला कसे कळत नाही,असा सवाल सर्वसामान्य जनताच करित आहे.कुठे पारदर्शक प्रशासन आणि कुठे तो शासनाचा जी.आर याचा फायदा मात्र गुटखा डिलर याला होतो हे मात्र निश्‍चितच.

          मुरबाड पोलिस प्रशासन गुटखा डिलरला पकडण्यात तर अपयशी ठरली आहे परंतु त्याचे वारसदारालाही पकडण्यात अपयश आले आहे.अलीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पोलिस प्रशासन यांचेवर गुटखा बंदीवर नियंत्रीत आणण्यासाठी कामगिरी सोपविली होती परंतू मुरबाडमध्ये सर्रासपणे गुटखा विक्री चालूच आहे.पोलिस प्रशासनाचे गुटखा विक्री वारसदाराला कवच देत असून कोणतीही कारवार्इ करत नसल्याचे दिसून येत आहे.याच गुटखा विक्रीवर मंत्रालयात,ठाणे जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करण्यात आली असतानाही कोणतीही कारवार्इ केली गेली नाही.कारवार्इचा बडगा पोलिस अधिकारी उचलत नसल्याने गुटख्याचा वारसदार मोकाटच आहे.विटभट्टीची दारू जशी मिळते तसेच गुटखा मिळतो हा विषय आता कॉमन पध्दतीचा झाला आहे.यंत्रणा आहे परंतु प्रभावी नही असे म्हणायला हरकत नाही.अवैध धंदेवाल्यांचे कवच बनू पाहणार्‍या अधिकार्‍यांना वरिष्ठ अधिकारी जाब विचारत नाही त्याचा फायदा खालील अधिकारी वर्ग घेत असून मोठया प्रमाणात तर हप्तेबाजी ठरली नाही ना असा सवाल केला जात आहे.

          विकास निधी आला तर ताशोरे मारले जाते परंतू ज्या गुटख्यामुळे तरूण वर्ग व्यसनधिन होतोय त्यावर ताशोरे का मारले जात नाही़.ठाणे जिल्हयात अनेक ठिकाणी गुटखा जप्त करून कारवार्इ धडाडी पध्दतीने सुरू आहेत परंतू मुरबाड शहरात ते चित्र पाहण्यात येत नाही.याला जबाबदार कोण ? असा प्रश्‍न उद्भवत आहे.याकडे थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालावे अशी विनंती केली जात असून संबंधित पोलिस अधिकारी यांचेवर कारवार्इ व्हावी व मुरबाडचा गुटखा बंद करण्यात पारदर्शकता दाखवावी अशी मागणी होत आहे.

         

No comments