0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

बोईसर, तारापूर औद्योगिक क्षेत्रांतील प्रदूषण आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून प्रभावी कामगिरी करावी. येत्या महिन्याभरात प्रदूषण पातळीत कमालीची घट आणण्याकरीता प्रयत्न करावेत, असे निर्देश पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.पालघर जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या  बोईसर, वसई, तारापूर या औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या विविध अडचणी, प्रदूषण, अपघात, सांडपाणी प्रक्रिया केंद्र या संदर्भात आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री.भुसे यांनी मंत्रालयात बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.

Post a Comment

 
Top