0

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण

आज दि. ३० अॉक्टोबर २०२० रोजी मा.सचिव,कृषी.श्री.एकनाथजी डवले साहेब व मा.जिअकृअ ठाणे, श्री.माने साहेब यांनी मौजे रुंदे,तालुका कल्याण येथे सुदामा स्वयंसहाय्यता गटामार्फत राबविणेत येत असलेल्या गटशेती प्रकल्पास भेट दिली

भेटीदरम्यान मा.श्री.डवले साहेब यांनी गटशेतीमधील विविध उपक्रमांची पाहणी केली.त्यामध्ये सामुदायिक सिंचन,सामुदायिक गोठा,सामुदायिक शेततळे,पॕकहाऊस, सोनचाफा लागवड,आंबा लागवड इ.ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन मार्गदर्शन केले.भविष्यात विकेल ते पिकेल मधून  गटाने कशाप्रकारे तयारी करावी याबाबत चर्चा केली कार्यक्रमादरम्यान रुंदे येथील शेतकऱ्यांना हरभरा वाटप करण्यात आला

         या कार्यक्रमांकरिता कल्याण पंचायत समितीचे मा. उपसभापती श्री.रमेश बांगर तसेच ताकृअ कल्याण,श्रीम.निखाडे, मंकृअ कल्याण,श्री.पथारे,कृप खडवली श्री.घुडे,कृस श्रीम.चौधरी मॅङम(कृषी सहाय्यक) तसेच सुदाम स्वयं सहायता बचत गटाचे अध्यक्ष सुदाम पाटील व सर्व शेतकरी शेतकरी मित्र परमविर पाटील छाया चौधरी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top