web-ads-yml-728x90

Breaking News

कल्याणमध्ये ९ कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव ; सन्मान कर्तुत्वाचा,जागर स्त्री शक्तीचा..

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण

सामाजिक बांधिलकी जपून महिलांच्या उत्कर्षांसाठी नि:स्वार्थ भावनेने कार्यरत व प्रसिद्धीच्या मोहापासून अलिप्त अशा ९ कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून करण्यात आला.महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांच्या पुढाकाराने कल्याण परिसरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व कोरोना महामारीच्या काळात गरजू व गरीबांना अहोरात्र मदत करणाऱ्या कोरोना योद्धा असलेल्या ९ महिलांचा सत्कार व सन्मानपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता 


या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कदम,जिल्हाध्यक्षा नयना भोईर,जिल्हा सचिव वासंती जाधव,जिल्हा सहसचिव श्रेया भांबीड,जिल्हा संघटक भारती कुमरे,नगरसेविका तृप्ती भोईर,उपशहर अध्यक्षा गीता काट्रप,शहर संघटक वैशाली सोनटक्के,विभाग अध्यक्षा भारती डाकवे,सुधा शहा,उपविभाग अध्यक्षा कोमल रॉय,उपविभाग अध्यक्ष जितेंद्र वाघचौरे, उपशाखा अध्यक्ष सागर कोळजे,मनवीसे अध्यक्ष विशाल वाघचौरे, समाजसेवक सतिश साळवी,पत्रकार चारुशीला पाटील,शाही मुल्ला,किरण गायकवाड, स्वप्नील कदम,आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. रुपाली आळंदे, (पोलीस), अनुसया कांबळे (समाजसेविका), डॉ.वृषाली थोरात-घारगे ( वैद्यकीय सेवा), स्वरा देसाई ( पोलीस ), विद्या आरेकर ( वैद्यकीय ), गीता बोरगावकर ( लघु उद्योजिका), कविता लोखंडे ( पत्रकार ), डॉ. तेजस्विनी माळवी ( वैद्यकीय) आदींना साडी,चोळी,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

No comments