web-ads-yml-728x90

Breaking News

महात्मा गांधींची ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना साकार करणे सर्वांचे कर्तव्य : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

सेवाग्राम येथे वास्तव्य असताना महात्मा गांधींनी आत्मनिर्भर भारताची आधारशीला मांडली. गांधीजींच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे व तीच त्यांना सच्ची आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिन्दी विद्यापीठाने गांधीजींच्या १५१ व्या जयंती वर्ष समारोपानिमित्त ‘दीपोत्सव’ तसेच ई- पुस्तकाचे प्रकाशन आयोजित केले होते, त्यावेळी राजभवन येथून दूरस्थ पद्धतीने सहभागी होताना राज्यपाल बोलत होते.

No comments