web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडच्या रूग्णालयात आपुर्या सुविधा असताना डॉक्टरानी केली जुळया बाळाना जन्म देणार्या महिलेची प्रस्तुती

BY - गौरव शेलार , युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड ,ठाणे

गरीबासाठी डॉक्टरच देव असतो आणि सरकारी डॉक्टरच खरा समाजयोध्दा असतो याची प्रचिती मुरबाड ग्रामीण रूग्णालयातील डॉ.हेमंतकुमार खंबायत,डॉ.स्वप्नील वाघचौडे,डॉ.विक्रांत गुजर यांनी दिली आहे.लक्ष्मी हिलम वय 30 वर्षे या महिलेने दोन बाळाना जन्म दिला तिची प्रस्तुती कोणत्याही सुसज्ज यंत्रणा सामुग्री नसताना तीन्ही डॉक्टरानी यशस्वी केल्याने सरकारी डॉक्टरच गरीबाचं कैवारी ठरले.सरळगांव आरोग्य केंन्द्रात सुविधा नसल्याने लक्ष्म़ीला मुरबाड ग्रामीण रूग्णालयात दाखल केली मात्र यंत्रसामुग्री भुलतज्ञ नसताना जुळया बालकाना सुखरूप महिलेच्या समोर आणल्याने आदिवासीनी डॉ.खंबायत ,डॉ.वाघचौडे ,डॉ गुजर तसेच खाजगी महिला प्रस्तूतीधारक मावशी तसेच सिस्टर यांचे आभार मानले.पुढे जाण्यासाठी अँब्युलंश नव्हती खाजगी दवाखाण्यात नेली असता खर्च परवडणारे नव्हते अशा अनेक समस्या हिलम कुटूंबासमोर होत्या मात्र सरकारी डॉक्टरांनी मोफत सेवा दाखवुन दिली नागरिकांनी सरकारी रूग्णालयात उपौचार घ्यावेत महिलानी प्रस्तूतीचा लाभ घ्यावा असे सुसज्ज आरोग्यसेवा येथील डॉक्टरानी दिली आहे.

No comments