0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- यवतमाळ |

यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून आज पिकांची पाहणी करण्यात आली.  नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, ढगफुटी यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. नुकतीच अंदाज आणेवारी जाहीर करण्यात आली. अंतिम आणेवारी निघायची आहे. सर्व पिकांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळावा यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून घामाचा पैसा घेतात. त्यामुळे ठोस मदत मिळणे गरजेचे आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Post a Comment

 
Top