web-ads-yml-728x90

Breaking News

आमदार किसनराव कथोरे यांच्या हस्ते टिव्ही चॅनेल वृत्तपत्र व ट्रस्टच्या त्रिसंग मुख्यकार्यालयाचे उदघाटण स्थानिक घडामोडीना प्राधान्य मिळेल - आ.कथोरे

 


BY - गौरव शेलार , युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे

संपुर्ण देशात अतिवेगाने प्रसारित होणारे झुंझार पत्रकारांचे निर्भिड वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र लार्इव्ह टिव्ही चॅनेल (ब्रॉडकास्ट मान्यता) ,सा.स्वप्नज्योती टाम्स वृत्तपत्र,आमदार किसनराव कथोरे विकासमंच  ट्रस्ट या मुख्यकार्यालयाचे उदघाटण आमदार किसनराव कथोरे यांच्या शुभहस्ते दसर्‍याच्या मुर्हतावर पार पडले.


यावेळी आमदार किसनराव कथोरे विकासमंच ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ज्योती शेलार,लोकमतचे पत्रकार शामभाऊ राऊत ,उद्यौजक तथा पत्रकार मन्साराम वर्मा (ठाणे),समाजसेवक किसन भोर्इल (घोरले), संपादक नामदेव शेलार,उपसंपादक मिलींद दळवी,समाजसेविका मेद्या थोरात,दिपाली दळवी,विठ्ठल गडगे, संपादक कुणाल शेलार ,मुख्यसंपादक गौरव शेलार, अ‍ॅड.किरण थोरात ,विजय डोंगरे ,नथुराम मलपेकर, स्वप्नील चव्हाण ,मयुर जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यालयाच्या उदघाटण प्रसंगी विशेष अतिथी म्हणुन मुरबाड तालुका प्रमूख कांतीलाल कंठे ,ठाणे जिल्हा सेक्युलरचे युवा नेते रविंद्र चंदने ,मुरबाडचे तलाठी शिंदे तात्या ,निलेश गायकर ,पत्रकार आरूण ठाकरे, पत्रकार निलेश जोशी ,केदार नार्इक ,नंदिनी शेलार ,मयुर दळवी ,मिताली शेलार ,हितेश शेलार यांनी उपस्थिती दाखवुन शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार शामभाऊ राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना युवा महाराष्ट्र लार्इव्ह टिमचे अभिनंदन केले.आमदार किसनराव कथोरे यांनी आपल्या शुभेच्छात ग्रामीण भागातील समस्या मांडुन येथील जनतेला न्याय मिळेल अशा पत्रकारितेची अपेक्षा  उदघाटण प्रसंगी पुर्ण होर्इल अशी मनोगत आमदार किसनराव कथोरे यांनी व्यक्त करून युवा महाराष्ट्र लार्इव्ह टिव्ही चॅनेल ,स्वप्नज्योती टार्इम्सच्या सर्व पत्रकार टिमला शुभेच्छा देवुन दसरा निमित्त तमाम जनतेलाही शुभेच्छा दिल्या.

पत्रकारीता चांगल्या विचाराने ठरवलीतर विश्‍वासाने लोक जोडली जातात चांगल्या बातम्या लोकांपर्यंत पोहचतात मुरबाडच्या विकासामध्ये आपण आलो पाहिजे.नविन घटनाचे लार्इव्हचे काम युवा महाराष्ट्र लार्इव्ह करतात यापुढे अधिक गतीने होर्इल आमचं मुरबाड बदलतय या वाहिनीच्या माध्यमाने नवनवीन बातम्या आपल्या पर्यंत पोहचतील अशी भावना व्यक्त करून दसरा निमित्त तमाम जनतेला शुभेच्छा देवुन युवा महाराष्ट्र लार्इव्ह पत्रकारांची टिमचे स्वागत करून आमदार किसनराव कथोरे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी वृत्तसंपादक ज्योतीतार्इ शेलार ,नामदेव शेलार यांनी  किसनराव कथोरे यांचे स्वागत केले तर भाजपा तालुका अध्यक्ष मुरबाड जयवंत सुर्यराव सर यांचे स्वागत मिलींद दळवी, दिपाली दळवी यांनी केले.

No comments