0

 

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टीट्यूट ऑफ माऊंटनिंग, पुणे या संस्थेचे  ‘साहसी शिक्षण अभ्यासक्रम’ साठी क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या समोर सादरीकरण करण्यात आले.प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासोबतच साहस प्रशिक्षण हा विषय मुलांच्या अभ्यासक्रमात असावा. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल, असे या सादरीकरणादरम्यान  सांगण्यात आले.राज्यमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या, तंत्रज्ञानाच्या या काळात गॅझेट्सवर आपला जास्तीत जास्त वेळ घालवणाऱ्या मुलांना गिर्यारोहणाच्या प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास, भूगोल या विषयाच्या अभ्यासाबरोबरच निसर्गाप्रती गोडी निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. त्यानुसार या संस्थेमार्फत साहस प्रशिक्षण विषयक उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात यावा व त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम पहावेया बैठकीस क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उपसचिव श्रीमती नानल, क्रीडा उपसंचालक, रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी, रायगडच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top