0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

काही महिन्यांपासून रखडलेल्या एसटी महामंडळाच्या लाखो कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत (8 ऑक्टोबर) जमा होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. नुकतंच ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली. तर उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय घेऊ, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.मागील साडेपाच महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा सोडली तर एसटीचा पूर्णपणे प्रवास बंद होता. अगोदरच एसटी प्रचंड तोट्यात होती. त्यात हे कोरोनाचं संकट आलं. त्यामुळे एसटी आणखी तोट्यात गेली. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार कित्येक महिन्यांपासून रखडले होते. या पार्श्वभूमीवर नुकतंच परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पगाराची थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी याबाबतची मागणी केली.

Post a Comment

 
Top