मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुजोरपणा माहिती अधिकार खाली माहिती देण्यास सरकारलाच नकार
BY - नामदेव शेलार , युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड
माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांच्या वर्चस्व कालावधीत मुरबाड
शहरातील महसुल भुखंडावर अनाधिकृत इमरत उभी करून लाखो रूपयाने व्यापारी गाल्याची विक्री
करणार्या मुरबाड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रभारी सचिवानी शासनाच्या माहिती
अधिकार कायदयाला आहवान दिले असुन उच्च न्यायालयाचा निर्वाला देत माहिती देता येत नाही
असे पत्र महाराष्ट्र सरकार (पणन) महामंडळाला दिल्याने राजकीय भुखंड महामेरूची हारमखोरी
करणार्यावर तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.तेव्हाची राष्ट्रवादी काँगे्रस सत्तेत होती
त्याकालावधीत माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुर्णता
वचर्स्व ठेवून मुरबाड शहरातील महसुल भुखंड 4 एकर 27 गुंठे जमिन कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या नावे प्रॉपट्री कार्डवर करून घेवुन तेथे तीन व्यापारी इमारती उभ्या करून
त्याची ठेकेदारी आपले पुत्र सुभाष पवार यांना दिले.कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडुन
नेलेले उमेदवार सभापती उपसभापती यांच्या नातेवार्इक तसेच माजी आमदार गोटीराम पवार यांचे
पुत्र सुन यांच्या नावे व्यापारी गाले केवळ 1 लाख 20 हजार तर काहीनी 2 लाख 50 हजाराने
गाले विकत घेवून दोन्ही इमारतीमध्ये वाढीव गाले काढुन कोटी रूपये कमविले तसेच प्रथमवर्ग
न्यायालयाच्या पाठीमागे महसुल जागेत अनाधिकृत इमरत बांधुन 70 गाले 5 ते 7 लाखात विक्री
करून कोटी रूपये चेअरमन संचालक प्रभारी सचिव तसेच ठेकेदार सुभाष पवार यांनी जमा केले
आहेत त्या इमारत बांधकाम प्रकरणी ठेकेदार सुभाष पवार यांना महसुल खात्याने 19 लाखाचा
रॉयल्ट्री दंड केला होता त्याचा भरणा सुभाष् पवार यानी अद्याप भरलेला नसल्याचे वृत्त
आहे.मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तिसर्या अनाधिकृत इमारतीला विजपुरवठा नाही
ग्रामपंचायत तेव्हाची आताची नगरपंचायत यानी परवानगी दिली नव्हती मात्र मुरबाड नगरपंचायतीच्या
मुख्याधिकार्यानी 14 लाख दंड आकारून अनाधिकृत घरपट्टी आकारणी केल्याची माहिती मुरबाड
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिल्याने मुरबाड कृषी उत्पन्न बाजार
समितीची 70 व्यापारी गाले असलेली इमरत अनाधिकृत असल्याचे निष्पन झाले आहे.स्वताच कृषी
उत्पन्न बाजार समितीची 70 गाले असलेली इमरत अनाधिकृत ठरवून कर आकारणी केली असल्याने
शासनाने त्या ठेकेदार चेअरमन संचालक प्रभारी सचिव याच्यावर गुन्हा दाखल करून सदर इमरत
निकाषीत करावी अशी मांगणी शेतकर्यानी केली आहे.मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
अनाधिकृत इमारतीला विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता कल्याण उपअभियंता सुरेश सोडकर
यांनी विद्युत पुरवठा केला असुन त्यांच्यावर कारवार्इ करण्याची मागणी केली जात आहे.कृषी
उत्पन्न बाजार समिती मुरबाडचे चेअरमन सचिव संचालक यांनी खोटे ठराव कागदपत्र बनवुन शासनाचा
निधी हाडप केला आहे.शेतकर्याना उपौयोगी असणारे व्यवसाय त्यामध्ये नसुन क्लासेस हॉटेल
अन्य दुकाने थाटून शेतकर्याच्या नावाने शासनाचा भुखंड लाटला आहे.त्या कृषी उत्पन्न
बाजार समितीमध्ये आता राष्ट्रवादीतुन शिवसेनेत गेलेले व भाजपाचे संचालक असुन सत्ताधारी
विरोधक दोद्येही आपआपसात शासनाचा भुखंड व्यापारी गाले गिळगुत करण्याचा प्रयत्न करत
असुन त्यांची चौकशी मुख्यमंञ्यानी स्वता करावी आपल्या नावाने भुखंड गिळगुत करणार्या
राष्ट्रवादीतुन आलेल्या चेअरमन संचालकांना ठेकेदार यांना पाठीशी घालू नये तसेच स्थानिक
आमदार भाजपा विरोधी पक्षानी आवाज उठवावा दोद्ये मिळुन गाले वाटप करून घेवु नये अशी
शेतकर्यांची मागणी आहे.
No comments