मुरबाडमधील गुटखा विक्रीचा वारसदार कोण ? गुटखा विक्रीला उद्दान ; मात्र कोरोनाच्या नावाखाली कारवार्इ शुन्यच
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव- मुरबाड |
मुरबाड शहरासह तालुक्यामध्ये
काही वर्षापासून गुटखा विक्री चा सर्रासपण गैरधंदा सुरू असून गुटखा डिलरला पकडण्यात
मुरबाड पोलिसांना व संबंधित विभागाला अपयश आले आहे.
अलीकडे गुटखा विक्रीचा डिलर नसल्याने त्याचा
वारसा कोणाकडे गेला असावा असा प्रश्न सध्याच्या कोरोना परिस्थितीत नागरिकांना येऊन
पडला आहे.युवकांचे फफ्फुसे खाराब करून वार्इट मार्गाकडे नेणार्या मुरबाडच्या गुटखा
कंपनी विक्रेते सेलर,डिलरचा वारस या तरूणांच्या जीवाशी खेळ करणार्या बाबीला जबाबदार
असून अद्दयाप तरी पोलिसांनी त्यांच्या विषयी ठोस पाऊल उचललेले नाहीत.वारंवार तक्रारी
होतात,वारंवर पोलिसांना गोपिनीय सांगितले जाते,वारंवार बातम्या प्रसिध्द होतात परंतू
कानाडोळा करणार्या अधिकार्यांमुळे गुटखा विक्री सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र सध्याच्या
कोरोना स्थितीत आढळून येत आहेत.कोणतीही कारवार्इ केली जात नसून मोठया प्रमाणात हप्ते
घेतले जात असल्याची चर्चा आहे.पानटपरीवर तरूणांच्या समवेत कधी कधी पोलिस देखील गुटखा
घेण्यासाठी येत असल्याचे म्हंटले जात आहे.वरिष्ठ अधिकारी आतमध्ये असल्याने फक्त कोरोना
एके कोरोना चालविल्याने कायदा कलम एखाद्दयाने सांगितल्यास त्या नागरिकाला ओरडून आवाज
चढवून त्यांच्याशी हुमरी तुमरी पध्दतीने बातचीत केली जाते.मोठया प्रमाणात मुरबाड शहरात
अवैध धंदे चालू असून पोलिसांना मोठया प्रमाणात हप्ते मिळत असल्याने कारवार्इ ही शुन्यच
राहिली असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.
कायदा सुव्यवस्था आज लहानांपासून मोठयांना
माहीती आहे परंतू अवैध धंदे हे कदाचित कोणत्याही कायद्दयात शिक्षेचे पात्र नाहीत असेच
म्हणावे लागेल कारण,जर शिक्षा आहे तर कायदा त्यांना लागू का होत नाही यासाठी ठाणे ग्रामीण
पोलिस अधिक्षीक,ठाणे जिल्हाधिकारी यांनी लक्ष वेधणे गरजेचे ठरेल.एकादी तक्रार गोपिनीय
केली तर गुटखा विक्रेते आपला गोडाऊन मधील अवैध बनावटी गुटखा माल दुसर्या ठिकाणी हलवितात
त्यामुळे त्या तक्रारीला शुन्य कारण प्राप्त करून दिले जाते.मुरबाडच्या गुटखा विक्रीला
सध्या कोरोना प्रादुर्भावात जास्त उद्दान आल्याने खोटे,मोठे, रोठे,छोटे,भार्इ यांनी
हप्ते गिरी लावून अवैध धंद्दयांना चालना दिली आहे.आमचा धंदा व्हार्इट असल्याचे दाखवून
यांचे घोडे टार्इट ठेवल्याने कारवार्इ केली जात नाही.त्यांना पाठबळ देणारे अधिकारी
वर्ग यांची प्रथम चौकशी केली पाहिजे व त्यांना बडतर्फ केले पाहिजे.खालच्या चौकशा दाबल्या
जातात,कारवार्इ केली जात नाही,वरिष्ठांना नील अहवाल दाखवून मुरबाड शहारतील अवैध गुटखा
धंदा खुलेआम चालू ठेवला जातो.याकडे ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षीक तसेच ठाणे जिल्हाधिकारी
यांनी लक्ष वेधले नाही तर गुटखा विक्रीचा बादशाहा जन्माला येर्इल आणि त्याला आळा घालणे
कोणालाही शक्य होणार नाही हे निश्चितच.
No comments