web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडचे तलाठी शिंदे तात्या यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा...

BY,कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव्ह - मुरबाड 

मुरबाडला अनेक तलाठी यांनी पदभार स्विकारला,अनेकांनी जनसामान्यांची कामेही केली परंतु आत्ताचे लाभलेले मुरबाड तलाठी शिंदे तात्या यांच्या कार्यशैलीची प्रशंसा सर्वत्र होत आहे.त्यांच्याकडे येणारा प्रत्येक जनसामान्य माणूस मोठ्या अपेक्षेने येतो त्यांच्या अपेक्षेला तडा जाऊ नये म्हणून अटीतटीत शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांचे काम मार्गी लावण्यात शिंदे तात्या यांचे महत्वपूर्ण योगदान ठरत आहे.पैशासाठी सर्वच काम करतात मुरबाडचे तलाठी माणूसकी वृत्ती धरुन केवळ अशिर्वाद प्राप्ती साठी गोरगरिबांची कामे करताना पाहायला मिळत आहे.कधी कोणतेच काम तलाठी शिंदे तात्यांनी अपूर्ण ठेवले नाहीत.सर्व कामे पुर्णत्वाचे मार्गी लावले आहेत असे अभ्यासू,कुशल,बुध्दीवान,निर्भिड,कर्तव्यदक्ष व अनुभवी तलाठी आजपर्यंत मुरबाडला लाभलेच नसावे.शिंदे तात्या यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी कल्याण,भिवंडी,पडघा,शहापूर येथिल नागरिक येत असतात.मुरबाड करांच्या हाकेची साथ मुरबाडचे तलाठी शिंदे तात्यांची असल्याने जनसामान्यांची कामे तात्काळ होतांना दिसत आहेत त्यामुळे त्यांच्या कार्याची प्रशंसा व त्यांची पारदर्शक कार्यप्रणाली ही नायक भूमिकेतून ठरली आहे.त्यांच्या शासकीय कामकाजा बरोबर सामाजिक कार्याची वाटचाल उधान जोमाने असल्याने मुरबाड शहारासमवेत तालुक्यात त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

     मुरबाडचे तलाठी म्हणून शिंदे तात्यांनी अनेक गोरगरिबांची कामे करुन दिली परंतु कुठेही गालबोट लागेल व शासनाचे नाव मलीन होईल असे कोणतेही कृत्य केले नाही.क्रिया आणि क्रियापद क्रियाशीलतेवर आधारित असते तसेच शिंदे तात्यांचे पारदर्शक काम शासकीय नियमाने स्वच्छ व परखड आहे कारण,त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आश्वासन नव्हे तर कार्यसिध्दी प्राप्ती होते त्यामुळे मुरबाडचे तलाठी शिंदे तात्यांना मानाचे मान मिळत असल्याने ते नावलौकिक ठरले आहे अशा शिंदे तात्यांच्या कार्यप्रणालीला पुढिल वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments