0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांचा आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH), पूर्व द्रुतगती महामार्ग (EEH), एसव्ही रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस रोड), अंधेरी – घाटकोपर लिंक रोड, जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोड (JVLR), सांताक्रुझ – चेंबुर लिंक रोड (SCLR) या रस्त्यांच्या सुधारणांबाबत पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आर. एल. मोपलवार, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, सोनिया  सेठी, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) यशस्वी यादव, मुंबई महापालिका रस्ते विभागाचे संजय दराडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले की, शहरातील ७ प्रमुख महामार्ग, त्यावरील फ्लाय ओव्हर यांची हाताळणी वेगवेगळ्या विभागांकडून होते. मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे हे मार्ग आहेत. शहरातील वाहतूक ही कोंडीविरहित तसेच सुरक्षित होण्यासाठी संबंधित एमएमआरडीए, एमएसआरडीसी, महापालिका, वाहतूक पोलीस आदी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. रस्त्यांच्या सुधारणा तसेच त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

 

 

Post a Comment

 
Top