web-ads-yml-728x90

Breaking News

जनसामान्यांच्या समस्या,तक्रारी निवारणासाठी ग्रामीण भागातील एका तरूणाला/तरूणीला 5 दिवसासाठी लोकप्रतिनिधी करा - कुणाल शेलार

BY -  युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |

अनेकांच्या समस्या या कोरोनामध्ये असो किंवा त्या अगोदर असो त्या समस्यांना,तक्रारींना तडा जात चालला आहे.महाराष्ट्रात समाजकारणापेक्षा राजकारण हे जादा चालू आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना वेळ मिळतच नाही.अनेक जणांनी कार्य केले तर अनेक जणांनी केवळ नावाचा गाजावाजा करून नावाची चर्चा उमटवली अशातच शेतकरी,गोरगरिब जनतेच्या समस्या,तक्रारींची कधी दखल घेतांना दिसले नाही.चेहरा तोच परंतू कार्य शुन्यच अशी जनता बोलू लागली असून जनसामान्यांच्या समस्या,तक्रारी या आजही शासन दरबारी कागदी घोडयावर रंगसली जात आहे परंतू न्याय दिला जात नाही.लोकअदालत घेऊन भांडणं मिटवली जातात परंतू लोकांचे प्रश्‍न सोडविण्याचा ठेका घेतलेल्या त्या लोकप्रतिनिधीला जनता एैनवेळी दिसलीच नाही.निवडणूकी पुरता पुढे पुढे करणारा लोकप्रतिनिधी आज कोरोनाच्या भितीने सुध्दा तळागळात येऊ शकला नाही अशातच जनता त्या लोकप्रतिनिधीकडे काय अपेक्षा करणार असा सवाल केला जात आहे त्यामुळे आता निवडणूका आल्यात म्हणून तोच चेहरा परत समोर येणार आणि लोटांगण घालणार हे निश्‍चितच.जनता समजदार झाली आता युवा पिढीने पुढाकार घ्यावा असा जोर उमटू लागल्याने निवडणूकीपुर्वी ग्रामीण भागातील तरूण वर्गाला केवळ 5 दिवसासाठी लोकप्रतिनिधीत्व करायला द्दया अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात येणार आहे.ग्रामीण भागाचा विचार आणि विकास करण्याची क्षमता आजच्या युवा पिढीच्या हाती आहे म्हणून लोकप्रतिनिधीपेक्षा समाजसेवकाच गोरगरिबांची कामे करताना रस्त्यावर दिसत आहे त्यामुळे ठाणे जिल्हयात प्रत्येक तालुक्यात विकासधीन गाव करण्यासाठी किमान एका तरी तरूणाला 5 दिवसासाठी लोकप्रतिनिधी म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी युवा पत्रकार कुणाल शेलार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

            आज जगात अशक्य गोष्ट शक्य करण्याची धमक युवा तरूणांमध्ये व तरूणीमध्ये आहे.ज्या महाराष्ट्रात जन्मलो,जिथं छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतीबा फुले,यांच्या विचार प्रणालीचा आभ्यास करून जगाच्या इतिहासात महाराष्ट्राचा नावलौकिक होर्इल अशी मनोधारणा मनात बाळगली जाते तेथे खर्‍या अर्थाने सुशिक्षीतांना मागेच ठेवले जाते आणि पैशाच्या जोरावर लोकप्रतिनिधी हा निवडून आणला जातो.आता हे थांबायला हवं त्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या कार्यवर्ष मर्यादेतील किमान 5 दिवस ग्रामीण भागातील तरूण व तरूणीला मिळावे असा ठराव पास करून इतिहासात काही तरी वेगळं केलं असल्याचे कोरावे अशी भूमिका आज तरूण-तरूणींनी मांडली आहे.केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे,या म्हणी प्रमाणे विकास करण्याची उमेद जी तरूणवर्गामध्ये आहे ती कुठे नाही परंतु पक्ष मध्ये असल्याने त्यांची धमक ही डावळली जाते त्यामुळे आम्ही महाराष्ट्रीयन,भारतीय आहोत आणिं आम्ही सर्व काही शक्य करू शकतो हे सिध्द करता येत नसल्याने तरूणांचा ओघ हा लोकप्रतिनिधींपेक्षा कमी पडू लागला आहे.शेतकर्‍याच्या मुलानी शिक्षण घेतलं परंतू नोकरी मिळाली नाही,नोकरी मिळाली परंतू शासकीय नाही मग अशातच गावाच्या बाहेर बसून विकास करण्याची उमेद समोर येते परंतू साथ कोणाची मिळत नाही म्हणून अशा ग्रामीण भागातील तरूणांना हीच ती वेळ आहे काही तरी करून दाखवण्याची आणि सिध्द करण्याची कि आम्ही पण लोकप्रतिनिधींपेक्षा जास्त विकास करू शकतो त्यासाठी ठराव आणा आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यवर्षात किमान 5 दिवस प्रत्येक तरूणाला आपल्या विधानसभेत विकास कामाला हात लावण्याची संधी द्दया अशी मागणी युवा पत्रकार कुणाल शेलार यांनी मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.


No comments