0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - लातूर

जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने 48 तासात पूर्ण करावे.  शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री श्री. देशमुख बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे उपस्थित होते.

Post a Comment

 
Top