0

 

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव्ह - ठाणे |

मार्च पासून ऑगस्ट पर्यंत  कोरोनावर प्रशासकीय कामकाज लोटणार्या आणि पडद्दयाआड  फार्इलवर सहृया करणार्या  अधिकारी वर्गाला मुख्यमंञ्यांनी आदेश देवून  जनतेची प्रलंबित  कामे मार्गी लावतील अशी मागणी शेतकरी कष्टकर्यांनी केली आहे.

          शालेय दाखले,विविध तक्रारीचे निवारण,शासकीय योजनांचा लाभ कुळवहिवाट दावे,उपविभागीय अधिकारी यांच्या दालनातील शेती संदर्भातील दावे,माहिती अधिकार,रेशनिंग धान्य घोटाळ,अनधिकृत बांधकामे,रॉयल्टी,दंडात्मक  दावे असे सर्व फायली  महसूल  विभागात प्रलंबित असून कृषी मंडळ अधिकार्यांकडून  शेतकर्यांना मार्गदर्शन,पुरग्रस्त,पीकहानी  यांची कामे होत नाहीत,अधिकारी आजपर्यंत कोरोनाचे नाव पुढै करून गरिबांची कामे टाळून बिल्डर्स,जमिनी दलाल  सावकार,भ्रष्टाचार काळाबाजार रॉयल्टी चोरटयांनी कामे चेंबूरमध्ये बसून करत आहेत त्यावर शेतकर्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

          शासनाच्या लीजवर दिलेल्या जमिनी अद्दयापही ताब्यात घेतलेल्या नसून त्या ठिकाणी ठाणे जिल्हयात दगडखाणी,माती,उत्खनन,रेती चोरी सुरू आहेत.मोठया प्रमणात रेती,माती,दगड,रॉयल्टी चोरी होत आहे मात्र,तहसिलदार,उपविभागीय कार्यालय यांचे दुर्लक्ष होतयं  याकडे पालकमंञ्यांचेही दुर्लक्ष झाले असून मुख्यमंञ्यांनी कारवार्इ करावी अशी मागणी होत आहे.

 

 

Post a comment

 
Top