BY - युवा महाराष्ट्र लाइव- गडचिरोली |
गोंडवाना विद्यापीठाने अंतिम परिक्षेबाबत
तयार केलेले मॉडेल माझ्या मते राज्यात अग्रस्थानावर आहे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण
मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. ते आज गडचिरोली येथे अंतिम परिक्षेच्या
संदर्भात बैठक घेण्यासाठी येथे आले होते.विद्यापीठाकडून परिक्षेसंबंधी
झालेली तयारी, अडचणी तसेच इतर अनुषंगिक विषयावर मंत्र्यांनी बैठकीचे आयोजन
जिल्ह्यात केले होते. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ऑनलाईन परिक्षेबाबत
तसेच ऑफलाईन (प्रत्यक्ष) परिक्षेबाबत तयार केलेले मॉडेलची पाहणी केली. यामध्ये
परिक्षा पद्धतीची निवड, अडचणी आल्यास पुन्हा परीक्षा तसेच अनुउर्त्तीण
विद्यार्थ्यांबाबत पुन्हा संधी यातील नियोजन चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. या
बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले,
संचालक परीक्षा व मुल्यमापन डॉ.अनिल चिताडे, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर,
सहायक जिल्हाधिकारी आशिष ऐरेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a comment