BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
करोना महामारीकडे आव्हान म्हणून न पाहता देशासाठी सेवा करण्याची
संधी आहे असे मानून युवकांनी साहसी होऊन समर्पण भावनेने देशासाठी कार्य करावे अशी सूचना राज्यपाल तथा
कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज स्नातकांना केली.महात्मा फुले, सावित्रीबाई फुले
तसेच लोकमान्य टिळक यांचे आदर्श डोळ्यांपुढे ठेवून कार्य केल्यास तुम्ही देखील आदर्श
नागरिक व्हाल असे राज्यपालांनी यावेळी युवकांना सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा
११७ वा दीक्षांत समारोह आज राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी
ते बोलत होते. उद्योगपती डॉ. नौशाद फोर्ब्स प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Post a comment